नगर ः मुकुंदनगर येथील रहिवासी श्री. शेख हबीब सर हे भैरवनाथ एज्युकेशन संस्थेच्या शाळेमधून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा हृद्य सत्कार मुकुंदनगरमधील रहिवाश्यांनी केला. शेख हबीब सर यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या सेवेचे यावेळी कौतुक करण्यात आले व त्यांच्या सेवाकार्यातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
सीक्यूएव्हीमधील सेवानिवृत्त अधिकारी हाजी शेख अब्दुल सईद हाफीज यांच्या निवासस्थानी एका सन्मान कार्यक्रमात हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शरीफुद्दीन शेख, हाजी रऊफ बिल्डर, हाजी आलम शफी, माजी नगरसेविका नसीम खानसाहेब आदि उपस्थित होते.
إرسال تعليق