पी.ए. इनामदार इंग्लिश स्कूलमध्ये झिलस स्पोर्टस मीट संपन्न

नगर - खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही; तो शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द शिकवणारा जीवनाचा खरा गुरू आहे.खेळांमुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न होते आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व समजते. मैदानावर जिंकणे–हारणे यापेक्षा महत्त्वाचे असते ते सतत प्रयत्न करत राहणे. जो प्रयत्न करतो, तोच खरा विजेता ठरतो.आजच्या या स्पर्धांमधून अनेक नवे खेळाडू घडतील, नवे ध्येय उभे राहतील.आपण सारे मिळून “खेळते रहा पुढे जात रहा” हा संदेश आपल्या आयुष्यात रुजवूया.असे प्रतिपादन इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी चे खजिनदार डॉ खालीद शेख यांनी केले.
इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या पी.ए. इनामदार स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये झिलस स्पोर्टस मीट 2025 चे वाडीया पार्क येथे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये टोपाज ग्रुप,डायमंड ग्रुप,
इमरल्ड ग्रुप व सफायर ग्रुप असे चार ग्रुप मध्ये 200 मीटर मुलांची रनिंग स्पर्धा घेण्यात आली.ज्यामध्ये प्रथम तांबोळी साऊद शहबाज, द्वितीय 
शेख तौहिद साजिद, तृतीय शेख मुसेब समीर तर 200 मीटर मुलींची रनिंग स्पर्धेत  प्रथम शेख अर्शिन साजीद, द्वितीय कुरेशी सुफिया अब्दुल नवाज, तृतीय तांबटकर जीक्रा माजीद यांनी विजय प्राप्त केला. याव्यतिरिक्त अनेक खेळांचे स्पर्धा यामध्ये घेण्यात आले.
सर्व विजयी विद्यार्थ्यांचे पी.ए. इनामदार स्कूलचे प्राचार्य युनूस सलीम, उपप्राचार्या सौ. फरहाना शेख, संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर, उपाध्यक्ष इकबाल सय्यद,सचिव विकार काझी, खजिनदार डॉ खालीद शेख, शब्बीर मोहम्मद तसेच सर्व संचालक मंडळ, एस.इंडिया फाउंडेशनचे संचालक व सर्व शिक्षकवर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा