नगर - समाजाच्या हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणे ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे. गरजूंना मदतीचा हात, शिक्षण, आरोग्य, सामाजिक ऐक्य आणि माणुसकी जपणाऱ्या उपक्रमांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या इस्माईल शेख यांचा वाढदिवस सामाजिक कार्याच्या गौरवाच्या रूपाने साजरा करणे खरोखरच चांगली बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगरचे शरफुद्दीन शेख यांनी केले.
मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इस्माईल शेख यांच्या सामाजिक कार्याचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त उहापोह करून गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगरचे अध्यक्ष शेख खानसाहब, रऊफ बिल्डर, हाजी आलम खान,माजी प्राचार्य नवेद बिजापुरे,शरफुद्दीन शेख,गोटु जहागीरदार,बिलाल अहमद,अजीज सय्यद,सईद शेख, इस्माईल पापामियां, बशीर पठाण, इस्माईल पठाण, फकीर मोहम्मद शेख, मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान आदी उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करतांना खानसाहब म्हणाले की, सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि निस्वार्थ कार्यातून इस्माईल शेख समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.
वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला सत्काराला उत्तर देताना इस्माईल शेख म्हणाले की,हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, सामाजिक कार्याच्या मूल्यांचा सन्मान आहे.व अधिकाधिक लोक सामाजिक कार्यात सहभागी व्हावेत, हीच अपेक्षा व्यक्त केली.
सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी इस्माईल शेख यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांच्या पुढील सामाजिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.त्यांच्या आयुष्यात आरोग्य यश आणि दीर्घायुष्य लाभो अशी सर्वांनीच सदिच्छा दिल्या.
إرسال تعليق