क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूरात भारतीय लहुजी सेनेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
क्रांतिगुरु लहुजी (वस्ताद) राघोजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास भारतीय लहुजी सेनेच्या सेना प्रमुख मिनलताई रेड्डी, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख, कायदेविषयक सल्लागार ॲड.रमेश कोळेकर ,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, वामनराव बोरसे,राज्य प्रमुख सुरेश अडांगळे, रघुनाथ खैरनार, युवा सेना प्रमुख सुंदराबाई बोरसे, संतोष मोकळ, शिव स्वराज चे सलमान पठाण, गौतमशेठ उपध्ये, मल्लुभाऊ शिंदे, विजयभाऊ शेलार, प्रजाकसत्ताक हॉस्पिटल चे बाळासाहेब मोरे, सुजाता मोरे आदीच्या उपस्थितित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी सुपस्टार सिद्धिविनायक आर्केस्ट्रा गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.

भारतीय लहूजी सेनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यात शहरातील निजामी  दवाखाना चे सुप्रसिद्ध डॉक्टर मुस्ताक निजामी (एम.डी.) यांना आरोग्दूत पुरस्कार, शितल प्रताप पठारे यांना आदर्श सरपंच पुरस्कार, विजया विवेक बारसे यांना माता रमाई पुरस्कार, जारवाल विठ्ठल सिंग इंदर सिंग यांना वनश्री पुरस्कार,अतुल सोपान तांबे यांना कृषी भूषण पुरस्कार, नंदकुमार तात्याबा बगाडे यांना पत्रकार भूषण पुरस्कार, दगडू रघुनाथ साळवे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार, किशोर गाडे यांना श्रीरामपूर  भूषण पुरस्कार, नितीन क्षिरसागर यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, करण नवले यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर समाजभूषण पुरस्कार देऊन 
गौरविण्यात आले. तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश आडांगळे ,शांतवत खंडागळे , शकील शेख , संदीप शेळके, रामभाऊ पिंगळे , रघुनाथ बलसाने , भाऊसाहेब आव्हाड ,ज्योती भोसले, राजेंद्र त्रिभुवन , शुभम बागुल ,फैजान पठाण, विश्वनाथ साळवे, अतुल शिंदे ,साबीर शहा, हाजी इमरान, महेमुद पठाण , नागेश साठे, सिकंदर तांबोळी , मतीन कुरेशी , अब्दुल शेख ,आसिफ शेख ,अभिमान कांबळे , ताराचंद खंडागळे ,युसुफ शेख, रमेश खामकर ,रमेज पोपटिया, सोमनाथ गायकवाड, हारून तांबोळी , सुनील सकट, विशाल मोजे , अमित कुकरेजा,भाऊ (भावड्या) वडीतके , केदार बागुल, रोशन शेख, सोनाली बागुल ,मंगल अहिरे ,पुनम दुशिंग, शांताबाई जौंजाळ, प्रिया बागुल ,कावेरी पवार , राजश्री बागुल, सोनाली मिनाज शेख, परवीन शेख , रमजान शेख ,राज शेडगे , विशाल मोजे ,जमील शेख , सलाउद्दीन शेख, अमजद कुरेशी , रघुनाथ खैरनार , रुपेश बागुल ,विजय पगारे, कारभारी साळवे, संतोष भडकवाड , परशुराम साळवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस भाई शेख यांनी आभार मानले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा