आस्मा अशफाक शेख यांचा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शिक्षक पुरस्काराने सन्मान

नगर - जिल्हा परिषद उर्दु शाळा केडगाव च्या निवृत्त शिक्षिका आस्मा अशफाक शेख या जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा केडगाव येथे २००६ पासुन मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. २००७ मध्ये संपूर्ण  हागणदारी मुक्त गाव साठी पालकमंत्रीच्या हस्ते पहिला बक्षिस मिळालं. २०१४ मध्ये शाळेला आय एस ओ ९००१ मिळाले. २०२०/२१ मध्ये पाचवी चा वर्ग सुरू केला. २०२२/२३ संपुर्ण पाचवी पर्यंतचे वर्ग मुख्याध्यापकची जवाबदारी संभाळून त्यांनी एकट्यानेच उत्तम रीतीने पार पाडले. व सलग तीन वर्ष रेगुलर पाचवीची स्कॉलरशिप निकाल उत्कृष्ठ लागला.
शाळेला वाॅल कंम्पाउंड नसल्याने बराच त्रास होत होता. २०२३ मध्ये मिशन आरंभ अंतर्गत काही पालकांच्या सहकार्य घेऊन स्वतचे ७० हज़ार रुपये टाकुन  एक लाख रुपये मध्ये ५० मीटरचे तार कंपाउंड व मोठा गेट लाऊन घेतला. शाळेत सुरवातीला विद्यार्थ्यांची संख्या ३०/३२ होती.ती आज ५१ आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले. केडगाव केंद्रात एकच उर्दू शाळा आहे.व शाळेच्या प्रगतीसाठी आस्मा शेख यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या या सर्व शैक्षणिक व सामाजिक बाबींचा आढावा घेऊन मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदे तर्फे देण्यात येणारा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शैक्षणिक पुरस्कार 2025 त्यांना प्रदान करण्यात आला.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात राष्ट्रीय कौमी एकता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात  शेख आस्मा यांना सर्जेपूरा येथील रहेमत सुलतान सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अँग्लो उर्दू हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज संगमनेरचे मुख्य विश्‍वस्त अब्दुलाह हसन चौधरी,चेअरमन हाजी शेख गनी, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मखदुम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुल्हेखान, डॉ.कमर सुरुर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सलीम खान पठाण, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे, सचिव युनूसभाई तांबटकर आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना शेख आस्मा म्हणाल्या कि कामाचे कौतुक झाल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात शिक्षकांवर सध्या वाढलेल्या अनेक कामाचे ताणतणावात पण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांनी आपल्या भाषणातून गौरव केला.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा