कु.ज़ुवेरीया अख़्तर शेख या ५ वर्षाच्या लहानगीने रमज़ान चा पवित्र रोज़ा पुर्ण केला. ज़ुवेरीया ही लर्निंग क्लाउड या शाळेत एल् केजी मध्ये शिकत असून, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रमज़ानचा पवित्र उपवास धरण्याचा हट्ट केला. तिचे आजोबा हाजी आफ़ाक ग़नी मोहम्मद शेख यांनी तिचा हट्ट पुर्ण करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले. अतिशय अवघड असणारा रमज़ानचा रोज़ा इतक्या कमी वयात पुर्ण केल्यामुळे परिसरातून आणि तिच्या कुटूंबातून तिचे कौतुक होत असल्याचे तिचे वडील इंजिनिअर अख़्तर शेख यांनी सांगितले. लहान वयातच मुलांवर सुसंस्कार झाल्यास भविष्यात त्यांना आदर्श जिवन शैली जगण्याची एक सुंदर सुरुवात मिळते असे देखील त्यांनी नमूद केले.
Post a Comment