नगर - नेहमीच नगरमध्ये धमाकेदार आणि नावीन्यपूर्ण सांगितिक कार्यक्रम देणाऱ्या ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा 'और इस दिल में' हा लाईव्ह कॉन्सर्ट येत्या शनिवारी, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे संध्याकाळी ५.३० ते ९.०० या वेळेत सादर होत आहे.
'और इस दिल में' हा लाईव्ह म्युझिकसह होणारा संगीतमय कार्यक्रम सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी आणि बप्पी लहरी यांच्या गीतांवर आधारित होणार आहे. और इस दिल में, प्यार करनेवाले कभी डरते नही, गोरे रंगपे ना इतना गुमान कर, हम बने तुम बने, सावन का महिना, यार बिना चैन कहा रे अशा अनेक गाण्यांचे सादरीकरण होणार आहे. हिरो, मेहबूब की मेहंदी, जंजीर, धर्मात्मा, एक दुजे के लिये, क्रांती, मिलन या अजरामर हिंदी चित्रपटांतील सुमधुर गीते या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.
अजित रोकडे, डॉ. कंगे, भानुदास महानुर, अजय आदमाने, डॉ. खंडागळे, प्रशांत बंडगर, डॉ. दमन काशीद, चारु ससाणे, सारंग पंधाडे, महेश घावटे, जीवन महाराज, बाबासाहेब जगताप, यशवंत अंबेकर, सारिका रघुवंशी, मोनाली बोरुडे, पूजा गडकरी, सीमा रघुवंशी, दुर्गा हुरे, प्राची लाटे, प्रतिभा साबळे इत्यादी कलाकार गीत सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात गिटार, सिंथेसायझर, ढोलक, ऑक्टोपॅड, बासरी, सॅक्सोफोन, तबला, ड्रम, कॉंगो इत्यादी संगीत साधनांचा वापर होणार असून संगीत नियोजन श्रीकांत गडकरी, सत्यजित, दिलावर शेख, अजित गुंदेचा इत्यादी करणार आहेत.
या कार्यक्रमात चांदीची नाणी, पैठण्या व इतर बक्षिसे लकी ड्रॉद्वारे जिंकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून पासेस ९४२०६३५०९६ / ९८९०८६२१५५ या क्रमांकावर संपर्क साधून उपलब्ध करता येतील. तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वारावरदेखील पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी चंदुकाका सराफ, हॉटेल क्लासिक, जाधव वडेवाले, एशियन नोबेल हॉस्पिटल, स्नेहदिप हॉस्पिटल, डॉ. काशिद हॉस्पिटल, वरद नेत्रालय, ग्लोबल इंटेरिअर, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, डॉ. जगताप डेंटल क्लिनिक, रेणुका ट्रॅव्हल्स इत्यादींनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे अशी माहिती ऋणानुबंधचे सचिन परदेशी यांनी दिली आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. गायत्री कुलकर्णी, विजय मोरे, वंदना कुलकर्णी, डॉ. झेंडे, योगिता कर्डिले व ऋणानुबंध परिवारातील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
إرسال تعليق