न्यायालयात केस प्रलंबित असताना ताबा कारवाई थांबविण्याची मागणी

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा न्यायालय येथे केस क्र. MA/355/2024 प्रलंबित असताना जमिनीवरील ताबा कारवाई थांबविण्याची मागणी करत मौजे वाकोडी येथील शेतकरी श्री. सागर बाबासाहेब पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी, नगर भाग, अहिल्यानगर येथे निवेदन सादर केले.
सागर बाबासाहेब पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे वाकोडी वाळूज शिवार येथील सर्वे नं. ३५८ ही जमीन वडिलोपार्जित असून ते आपल्या कुटुंबासह शेती व्यवसाय करून उपजीविका करत आहेत. सदर जमिनीबाबत अहमदनगर जिल्हा न्यायालयात केस क्र. MA/355/2024 प्रलंबित आहे.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मंडळाधिकारी यांच्या आदेशाचे पत्र मिळाले असून राजेंद्र शांतीलाल बलदोटा व इतर जण जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच मंडळाधिकारी व तलाठी कार्यालयातील कर्मचारी पाहणीसाठी आले होते.
यावेळी सागर पवार म्हणाले की, "सदर जमीन ही आमची वडिलोपार्जित असून मी माझ्या कुटुंबासह शेती करून उदरनिर्वाह करत आहे. न्यायालयात केस चालू असताना जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आम्ही चिंतेत आहोत. प्रशासनाने न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत ताबा कारवाई थांबवावी."
यावेळी विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिन साळवे यांनी सागर पवार यांना जाहीर पाठिंबा देत सांगितले की, न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन ताबा कारवाई थांबवावी व न्याय मिळवून द्यावा.
न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना जमिनीवरील कोणतीही ताबा कारवाई तात्काळ स्थगित करण्यात यावी, अशी मुख्य मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा