मराठी भाषा दिनानिमित्त शब्दगंधच्या कथा,कविता लेखन स्पर्धा

अहिल्यानगर (प्रतिनिधी ): *शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून लवकरच होणाऱ्या १७  व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नवोदित लेखक, कवींसाठी कथा लेखन व कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये  नवोदितांनी सहभागी व्हावे* असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
     कथा लेखन स्पर्धेसाठी एकल महिलांचे प्रश्न, विधवा प्रथा निर्मूलन अथवा विधवा प्रथा विरोधात प्रकाश टाकणाऱ्या कथा असा विषय  स्पर्धेसाठी ठेवण्यात आला आहे, कथा शब्द मर्यादा 3000 शब्द,असे स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर यांनी कळवले.
    खुल्या कविता लेखन स्पर्धा होत असुन विषयाचे कोणतेही बंधन नसल्याचे  स्पर्धा प्रमुख स्वाती ठुबे यांनी कळवले आहे. स्पर्धकांनी आपल्या कथा, कविता कागदाच्या एका बाजूस लिहून अथवा टाईप करून शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग  महालाजवळ, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर ४१४००३ येथे दि.५ मार्च २०२६ पर्यंत कथा, कविता स्वतःच्या असल्याचे प्रतिज्ञापत्र, परिचय,पासपोर्ट फोटो सह पाठवाव्यात, असे आवाहन प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर,स्वाती ठुबे व शर्मिला गोसावी यांनी केले आहे.
      कथा स्पर्धेसाठी विधवा महिला लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम चे प्रणेते प्रमोद  झिजार्डे, करमाळा यांच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा