सुभाष त्रिभुवन यांचा ‘कर्तव्यदक्ष समाजसेवक’ पुरस्काराने सन्मान

शौकतभाई शेख / श्रीरामपूर 
 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगर जिल्हा कार्याध्यक्ष तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांना त्यांच्या सौभाग्यवती सुशीला त्रिभुवन यांच्या समावेत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे ‘कर्तव्यदक्ष समाजसेवक’  पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
हा सन्मान मौलाना आझाद कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे मॅनेजर साहेबराव जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी माणिक जाधव, सुनील जाधव, अनिल जाधव आणि महेंद्र जाधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना साहेबराव जाधव यांनी सुभाष त्रिभुवन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर व तालुक्यात सुभाष त्रिभुवन यांनी सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेत सामाजातील उपेक्षित,वंचित आणी दुर्लक्षितांचे विविध ज्वलंत प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
तसेच श्रीरामपूर येथील विस्थापित व्यापाऱ्यांचा प्रश्न असो किंवा श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठीची आंदोलने असोत, अन्यायाला वाचा फोडण्याचे आंदोलने असो अशा प्रत्येक वेळी कायम दक्ष राहून समस्त अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे मोठे समाजकार्य सुभाष त्रिभुवन यांनी पुढे येऊन समाजहिताचे कार्य केले आहे. 
अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात, असेही जाधव यांनी नमूद केले.
“सुभाष त्रिभुवन हे छत्रपती संभाजीनगर चे जावई असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या हातून पुढेही असेच सामाजिक कार्य घडत राहो,” अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल श्रीरामपूर शहर तालुक्यासह जिल्हाभरातील सामाजिक शैक्षणिक आदी क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 956117411

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा