व्रती व्यक्तीचा गौरव निश्चितच आनंददायी साईनाथ कावट : पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी पत्रकारिता पुरस्काराबद्दल राजेश सटाणकर यांचा सत्कार

नगर : सकारात्मक काम करताना आपल्याच क्षेत्रातील व्रात्य लोक व्रती लोकांना त्रास देतात, तणावावर मात करून सकारात्मक काम सुरू ठेवणं हा सटाणकर यांच्या बाबतीतील अनुभव आहे.पत्रकारितेतून सामान्यांना महत्त्व देणारे सटाणकर हे असामान्य व्यक्तिमत्व आहे.पत्रकारिता निष्ठेने करून सामाजिक जाणीव ठेवून ते समाजात कार्यरत आहेत.हनुमान मंदिरातही त्यांचा सहभाग आहे.अशा व्यक्तीचा गौरव निश्चितच आनंददायी आहे असे प्रतिपादन उपनिबंधक कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी साईनाथ कावट यांनी केले.
पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सटाणकर यांना जाहीर झाला याबद्दल झेंडीगेट हनुमान मंदिरात भक्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी श्री कावट बोलत होते.याप्रसंगी शिवनारायण वर्मा,विजय खंडेलवाल, बद्रीनाथ राठी, मधुकर शहाणे,नंदलाल झंवर, पापालाल लढ्ढा,रामप्रसाद हेडा, राजू आखमोडे, सुरेश झंवर,आसाराम धाडगे, सतीश खंडेलवाल, रामदास कावट आदी उपस्थित होते.  
प्रारंभी हनुमानाची आरती करण्यात आली आयोजक शिवनारायण वर्मा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर  श्री कावट यांनी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सत्कार सोहळा आणि नववर्षाचे स्वागत प्रित्यर्थ मंदिरात प्रसाद वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.शेवटी राजु आखमोडे यांनी आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा