शब्दगंधचा कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार श्रीधर आदिक यांना जाहिर

अहमदनगर : “शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.श्रीधर आदिक यांना जाहिर करण्यात येत आहे,” अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
      कॉ.गोविंद पानसरे यांचा  स्मृतीदिन रविवार दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी असुन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कोहिनुर मंगल कार्यालयात दु. १२.३० वा. होणाऱ्या कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी ऍड.कॉ.सुभाष लांडे पाटील व स्मिता पानसरे उपस्थित राहणार आहेत.
कष्टकरी,श्रमिक,शेतकरी, शेतमजूर,असंघटित कामगार यांच्यासाठी अविश्रांतपणे काम करणारे कॉ.श्रीधर आदिक उमेदीच्या काळापासुन कार्यरत आहेत,ऊस तोडणी मजुर, महिला,शेतमजूर,कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल पुरस्कार निवड समितीने घेतली,त्यामुळे त्यांना हा पुरस्कार शनिवार दि.२० फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
     तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी व खजिनदार भगवान राऊत,प्रगतिशील लेखक संघाच्या राज्य उपाध्यक्षा शर्मिला गोसावी  यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा