अहिल्याबाई उर्दू हायस्कुल बेलापूरची २५ वर्षपूर्ती साजरी

बेलापूर येथील अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कुलला 25 वर्ष पूर्ण झाल्याने हायस्कुल चे  चेयरमन अब्दुल सलाम सर यांचं सपत्नीक नागरी सत्काराचे आयोजन हायस्कुलचे  स्थानिक कमिटी चे चेअरमन सामाजिक कार्यकर्ते जावेद जमाल शेख,  इमाम सय्यद सर अनिस कुरेशी सर यांनी व हायस्कुल चे मुख्याध्यापक जाकीर सर यांनी  केले.  संस्थेचे चेअरमन  मुस्लिम समाजचे नेते व अहमदनगर जिल्ह्याचे सरसययद  अहेमद खान संबोधले  जाणारे अब्दूल सलाम सर यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला . बेलापूरतील मुस्लिम समाज अब्दुल सलाम सरांवर विशेष प्रेम करतो व तसेच अब्दूलसलाम सर सुद्धा बेलापूर गावावर प्रेम करतात म्हणून त्यांनी बेलापुरात एक छोट्या गावात हायस्कुल सुरू करून मुस्लिम समाजाचे शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. हायस्कुल मधील शिक्षकांनी सुद्धा 10 वर्ष विनाअनुदान तत्वावर   
काम करून बेलापूरतील मुस्लिम समाजाची सेवा केली या बद्दल गावकऱ्यांनी शिक्षकांचे आभार व्यक्त करत  त्यांचे सत्कार केले

बेलापुरात उर्दू कॉलेज सायन्स,आर्ट,कॉमर्स तिन्ही साईड सुरू करावे व तसेच मुलांना औद्योगिक तंत्रज्ञान मिळण्या साठी ITI कॉलेज सुरू करावे अशी मागणी बेलापूर गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली .

उर्दू राष्ट्रीय मातूभाषा दिनाचे अवचित्य साधून उर्दू भाषेला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे व उर्दू शायरी व गजल लिहणारे बेलापूर गावातील भूमीपुत्र कापडाचे व्यापारी हाजी चांद साहेब यांचे जेष्ठ चिरंजीव  हायस्कुलचे शिक्षक  जाकीर चांद साहेब सय्यद ,  उभरता सितारा शायर व लेखक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक सय्यद जाकीरहुसैन सर यांची यशस्वी कारकीर्द म्हणून स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
विदयार्थ्यांना हाजी चांद साहेब सागर क्लेक्शन श्रीरामपूर यांच्या वतीने अल्पोहर देण्यात आले.
या प्रसंगी जाफरभाई,अत्तार, हाजी चाँद सहाब, गफ्फार भाई,मोहसीन शेख, आयाज भाई,अनिस सर,तौसिफ सर,फरीदा भाभी,शाळेचे मुख्याध्यापक जाकीर हुसेन रईस सर अबूबकर सर ,हुमा मॅडम अलमास मॅडम ,नॉन टिचिंग चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाकीर सर यांनी केले ,सूत्र सूत्रसंचालन रईस सर यांनी केले आभार अबूबकर यांनी मानले ,प्रसंगी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा