------------------------------------
गाता रहे मेरा दिल ग्रुप तर्फे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण
नगर - जगभरातील कोट्यावधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे स्वर आज आपल्यामध्ये नाही.लताजींच्या आवाजाच्या परिसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ पर्यंत लोकांच्या मनामध्ये गुंजत राहिल.लताजींच्या या आवाजामुळेच भारताचे नाव जगाच्या पाठीवर उमटविले आहे. असे प्रतिपादन संगीतप्रेमी अॅड.अमीन धाराणी यांनी केले.
गाता रहे मेरा दिल ग्रुपच्या वतीने लता मंगेशकर जींच्या श्रद्धांजली गीतांची मैफिलीचे मिनर्वा इन्फ्रा व न्यू मॉडर्न कंन्सट्रक्शन च्या सहकार्याने रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी एडवोकेट अमीन धाराणी बोलत होते. यावेळी डॉ.रेशमा चेडे, प्रशांत बंडगर, श्रिकांत सोंनटक्के, रामन्ना जी, दिलीप पांढरे, इंजि. जुबेर शेख, शौकत विराणी, किरण उजागरे, जावेद मास्टर, आर्कि.फिरोज शेख, सैय्यद खलील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात रहे ना रहे हम, हम थे जिनके सहारे,आपकी नजरोने समझा, नाम गुम जायेगा, जनम जनम का साथ है, तूने ओ रंगीले कैसा जादू किया, एक प्यार का नगमा है, तुम आ गये हो, असे अनेक लताजींच्या अजरामर गीते अॅड.गुलशन धाराणी, अभिजीत गायकवाड,दिपा भालेराव, सुनील भंडारी,निता माने, विकास पिटेकर,सेईद खान, नरेश पेवाल, दिनेश मंजरतकर, व अॅड.अमीन धाराणी यांनी सादर करून सभागृहाची वाहवाही मिळवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. तर आभार प्रशांत बंडगर यांनी मांडले.
Post a Comment