कुरआनची शिकवण अंगीकारल्यास जीवन सार्थक - कारी अब्दुलहमीद

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -प्रत्येक माणसाचे जीवन शुद्ध आचरणाने होण्यासाठी कुरआन शरीफची शिकवण आवश्यक आहे . कुरआन हा ग्रंथ सर्व मानवजातीसाठी आहे, तो फक्त मुस्लिमांसाठी नाही. कुरआनची शिकवण अंगीकारल्यास  जीवन सार्थक होईल. दैनंदिन जीवनामध्ये कुरआनच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाने आपले वर्तन केल्यास या जगातून वाईट गोष्टी नष्ट होतील . मुलींना कुरआनची शिकवण देऊन एक सुदृढ समाज निर्माण करण्याचे कार्य मुस्लिम समाजाने करावे . सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून सुरक्षित राखण्याचे कार्य त्यामुळे होईल . श्रीरामपूरमध्ये आज मुली शिकत आहेत . ही चांगली बाब आहे . मुलींच्या शिक्षणासाठी समाजाने सुद्धा हातभार लावावा असे आवाहन लखनऊ येथील मदरसा फातेमा लीलबनातचे प्रमुख कारी अब्दुलहमीद यांनी केले .
येथील साह्यता एज्युकेशन सोसायटी संचलित मदरसा हुदेबिया लीलबनात च्या वार्षिक पदवीदान व पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . यावेळी लखनऊ येथील मौलाना इक्बाल नदवी हे देखील उपस्थित होते. प्रारंभी मदरसा हुदेबियाचे प्रमुख मुफ्ती रिजवानुलहसन मजाहिरी यांनी प्रास्ताविक मध्ये मदरशाच्या कामकाजाची माहिती दिली. यावर्षी नऊ मुली संपूर्ण कुरआन शरीफ तोंडपाठ करून हाफेजा झाल्याचे सांगितले तसेच पन्नास मुली या आलेमा झाल्याचे सांगितले . मदरशाच्या विद्यार्थिनी मुलींनी यावेळी मुस्लिम संस्कृतीशी संबंधित भाषणे केली . महिलांनी कशा पद्धतीने आपले जीवन जगावे, समाजाने त्यांना कशी साथ द्यावी याबाबतही मंथन करण्यात आले. मदरशांमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना मदरसा तर्फे प्रमाणपत्र, ट्रॉफी व इतर भेटवस्तू देण्यात आल्या .यावर्षी मदरसा मधून अलिशा मोहमद हारुण तांबोळी,सानिया दिलावर शेख,फरहिन शकील काझी,हुमेरा सिराज शेख,मुस्कान मोहम्मद रफिक शेख, मुबशशरा अस्लम जहागीरदार, बुशरा इसाक कुरेशी,उम्मेहानि असलम जहागीरदार,बुशरा असलाम जहागीरदार मुलींनी हफिजाची पदवी धारण केली .
कार्यक्रमास विद्यार्थिनींचे पालक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी दुवा झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा