अहमदनगर (प्रतिनिधी) : येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांच्या “ आठवणींचा डोह ” या पुस्तकाचा प्रकाशन प्रकाशन समारंभ शनिवार दि.२ एप्रिल २०२२ रोजी दु.१.०० वा.कोहिनूर मंगल कार्यालय,पाईपलाईन रोड, अहमदनगर येथे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार,कविवर्य लहू कानडे साहेब,आदर्श गांव संकल्प व प्रकल्प योजना चे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,जेष्ठ कामगार नेते,विचारवंत कॉ.डॉ.भालचंद्र कांगो,औरंगाबाद येथील जेष्ठ साहित्यिक,विचारवंत प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर,स्नेहालय चे संस्थापक प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी,नारायणगाव येथील साहित्यिक,समीक्षक प्रा.डॉ.मिलिंद कसबे,जेष्ठ कादंबरीकार,शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर यांच्या प्रमुख उपस्थिती होत असल्याची माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली. शालेय व महाविद्यालयीन जीवन,विविध गावांची संस्कृती,समाज कार्यात कार्यरत असतांना संस्था,संघटना चे कार्य त्यांनी आठवणींचा डोह मध्ये शब्दबद्ध केलेलं आहे.
जिल्ह्यातील सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे,असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष सुभाष सोनवणे,कार्यवाह प्रा.डॉ.अशोक कानडे,खजिनदार भगवान राऊत,ज्ञानदेव पांडूळे किशोर डोंगरे,राजेंद्र पवार,शाहिर भारत गाडेकर,प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे,स्वाती ठुबे,कवयित्री शर्मिला गोसावी,बबनराव गिरी,रामकिसन माने,प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर यांनी केले आहे.
إرسال تعليق