विवेकयुक्त कृतीतून देश समृद्ध होऊ शकतो, सध्याच्या काळात पोसत असलेला सांस्कृतिक दहशदवाद हा देशाच्या संस्कृतीला धोका पोहचविणारा असल्याने तो थांबायला हवा,यासाठी कृतीशील कार्यकर्त्यांना पाठबळ मिळणे आवश्यक असुन त्यासाठी आठवणींचा डोह प्रेरणादायी ठरेल

अहमदनगर (प्रतिनिधी): *विवेकयुक्त कृतीतून देश समृद्ध होऊ शकतो, सध्याच्या काळात पोसत असलेला सांस्कृतिक दहशदवाद हा देशाच्या  संस्कृतीला धोका पोहचविणारा असल्याने तो थांबायला हवा,यासाठी कृतीशील कार्यकर्त्यांना पाठबळ मिळणे आवश्यक असुन त्यासाठी आठवणींचा डोह प्रेरणादायी ठरेल* असे प्रतिपादन जेष्ठ कम्युनिस्ट नेते  कॉ.भालचंद्र कांगो यांनी  केले.
       शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सुनील गोसावी यांच्या आठवणींचा डोह या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार लहू कानडे,पदमश्री पोपटराव पवार,जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर, डॉ.संजय कळमकर, प्रा.डॉ.मिलिंद कसबे,शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,कॉ.बाबा आरगडे,प्रा.स्मिता पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
       पुढे बोलतांना ते म्हणाले की,प्रत्येकाने स्वतः चा तळ ढवळताना आपल्या अंतःकरणात डोकावण्याची आवश्यकता आहे,अहमदनगर जिल्ह्यातील सहकार चळवळीप्रमाणे शब्दगंध  चळवळ साहित्याच्या क्षेत्रात अग्रेसर ठरेल.
   आमदार लहू कानडे  म्हणाले कि,जगण्याची लढाई लढत असताना आपल्या सोबत आपल्या मित्र परिवाराचे भावविश्व आठवणींच्या डोहात उलगडून दाखविण्यात आले आहे.सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील बदलते प्रवाह त्यामुळे लक्षात येतात. साहित्याच्या प्रवाहात दखल घेण्याजोगा हा ग्रंथ झाला आहे.
   प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, आठवणींचा डोह म्हणजे सुनील गोसावी सह अनेकांनी सामाजिक भान ठेऊन केलेल्या उपक्रमाचा,चळवळीचा हा दस्तऐवज अक्षर वाड्मय ठरणारा झाला  आहे,अनंत अडचणींवर सहज विजय मिळवत वैविध्यपूर्ण व विविध क्षेत्रातील माणस जोडली,अवतीभवती च्या माणसांचे वर्तुळ व्यापक करत करत माणसांचा चळवळीसाठी नवा भावबंध यामध्ये साकार केला आहे.
       विविध संस्था संघटना मध्ये कार्यरत असतांना सुनील ने प्रामाणिकपणे काम करून माणस जोडली त्यामुळेच आठवणींचा डोह तुम्हा आम्हा सर्वांचा झाला आहे,हिवरेबाजारला काम करतानाच्या काही घटनांचा ऊहापोह यात असल्याने आनंद वाटला,असे  पदमश्री पोपटराव पवार म्हणाले.
यावेळी प्रा.डॉ.मिलिंद कसबे,डॉ.संजय कळमकर, प्रा.स्मिता पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सावंत यांनी तर सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले.शेवटी सुनीलकुमार धस यांनी आभार मानले.शाहिर भारत गाडेकर यांनी क्रांतिगीत सादर करून स्वागत केले.
कार्यक्रमास चंद्रकांत पालवे,ऍड सुभाष लांडे पाटील,प्राचार्य जी.पी.ढाकणे,डॉ.गणी पटेल,ज्ञानदेव पांडुळे, मधुसूदन मुळे,प्रा.डॉ.चं. वि.जोशी, मेधाताई काळे,डॉ क्रांतिकला अनभुले,प्राचार्य चंद्रकांत भोसले,डॉ.विजयकुमार पोटे,संपत नलावडे,गोरक्षनाथ गिरी,डॉ.श्याम शिंदे,ऍड.सुधीर टोकेकर,अर्षदभाई शेख,ऍड सुभाष भोर,डॉ.बापू चंदनशिवे,गणेश भगत,शिवाजी साबळे,शब्बीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक कानडे,डॉ.रमेश वाघमारे,भगवान राऊत,डॉ.तुकाराम गोंदकर, किशोर डोंगरे,बबनराव गिरी,राजेंद्र पवार,राम किसन माने,हरिभाऊ नजन,डॉ.अनिल पानखडे,डॉ.किशोर धनवटे,स्वाती ठुबे,आरती गिरी,डॉ.अनिल गर्जे,प्रा.दिगंबर सोनवणे,ऋता ठाकुर,शर्मिला रणधीर,मीना गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
यावेळी झालेल्या काव्य संमेलनात शशिकांत गायकवाड, चंद्रकांत उदागे,आनंदा साळवे,सुभाष सोनवणे,शाहिर दिलीप शिंदे,शाहिर वसंत डंबाळे,मिराबक्ष शेख, सहभागी झाले होते. यावेळी आर्टिस्ट सतीश कुलकर्णी,गणेश दळवी,श्रीपाद कुलकर्णी  यांच्या विशेष सन्मान करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा