अहमदनगर-जुन्या काळातील प्रत्येक गायक व संगीतकाराने रसिकांसाठी एवढे अनमोल काही दिले आहे की जग संपेपर्यंत ते संगीत रसिकांच्या मनात राहून त्यांना मंत्रमुग्ध करत राहणार आहे. त्यात लता मंगेशकर जीं चा आवाज आहे. त्याच प्रमाणे बप्पी लहरींचा आवाज व संगीत दोन्ही कला आहे. जे कायम त्यांची एक वेगळी ओळख असणार आहे. त्याचप्रमाणे बप्पी लहरींनी युवापिढी असो की वयोवृद्ध सर्वांसाठी डिस्को संगीत व गीते गाऊन रसिकांना कायमची अमृत भेट दिली आहे. असे प्रतिपादन संगीत प्रेमी व गोल्डन व्हाईस म्युझिकल ग्रुपचे समीर खान यांनी केले.
लता मंगेशकर जी व बप्पी लहरी यांच्या गीतांची श्रध्दांजली महेफीलीचे गोल्डन व्हॉइस म्युझिकल ग्रुप च्या वतीने श्रद्धांजली गीतांची मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर रसिक उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. रेशमा चेडे यांनी बप्पी लहरी च्या व किरण वयकर यांनी लता मंगेशकर यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. तर या श्रद्धांजली गीतांच्या मैफिलीत विनय गुंदेचा, किरण उजागरे,समीर खान, विजय तण्णु महाराज, किरण वयकर, डॉ. रेशमा चेडे, स्नेहल नायडू,मनिष मुथा, राजु क्षेत्रे, विकास खरात यांनी,,, बडा नटखट है ये कृष्ण कन्हैया...गुम है किसी के प्यार में... यार बिना चैन कहां रे... तू मुझे जान से भी प्यारा है... दिल मे हो तुम... इंतेहा हो गई... चलते चलते मेरे ये गीत याद रखना... तुझे देखा तो ये जाना सनम... नाम गुम जायेगा... मुंबई से आया मेरा दोस्त असे अनेक जुने नवीन गीते सादर करण्यात आली.ज्याला रसिकांनीही भरभरून प्रतिसाद देत वाह,,, वाह,,,व टाळयांनी गायकांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. तर आभार विनय गुंदेचा यांनी मानले.
Post a Comment