सावित्री फातिमा विचार मंचचे बक्षीस वितरण संपन्न साने गुरुजींचे ‘इस्लामी संस्कृती’ हे पुस्तक सामाजिक ऐक्याचे प्रतिक -डॉ.सर्जेराव निमसे

अहमदनगर -  येथील सावित्री - फातिमा विचार मंचने साने गुरुजी लिखित इस्लामी संस्कृती या पुस्तकावर आधारित घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण अहमदनगर येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रफिक सय्यद, हाजी शौकतभाई तांबोळी, ऍड संभाजी बोरुडे, समन्वयक अली इनामदार, ह भ प भालेकर महाराज, ह भ प सोपानकाका औटी, मौलाना अब्दुल कदिरआदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.सर्जेराव निमसे म्हणाले की, साने गुरुजींनी इस्लामी संस्कृती हे पुस्तक लिहीत असताना सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने लेखन केलेले आहे. सदर पुस्तकातून इस्लामबद्दल अतिशय मोलाची माहिती मिळते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संस्कृतीप्रमाणेच त्यांना इस्लामी संस्कृतीचीही बहुमोल अशी माहिती मिळाली असेल. सदर पुस्तकातून इस्लाममधील समता, स्वातंत्र्य, विश्वबंधूता, न्याय आदिंची माहिती मिळते. प्रास्तविक करतांना डॉ.रफिक सय्यद म्हणाले की, सानेगुरुजींनी इस्लामी संस्कृतीची जगाला माहिती व्हावी म्हणून हे पुस्तक लिहिले आहे. मात्र सर्वसामान्य माणसाला याची माहिती नसल्याने सावित्री-फातिमा विचार मंचाने यावर आधारित ही स्पर्धा आयोजित केली होती. यात जवळपास 800 स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी स्पर्धकांसाठी दोन लाख 44 हजारांची बक्षिसे ठेवण्यात आले. सदर स्पर्धेत शालेय, महाविद्यालयीन व खुला असे तीन गट होते. 
गट अ) विजेते : प्रथम - अनिकेत विठ्ठल भुसारी, द्वितीय - सिद्धी आसाराम कोळेकर, तृतीय - कंपाली समरीन अब्दुल हमीद, गट ब) विजेते : प्रथम- अप्पासाहेब रावसाहेब वाबळे, द्वितीय - चेतन राजेंद्र राक्षे, तृतीय - विश्वास मधुकर शेरकर, गट क) विजेते : प्रथम - गणेश मच्छिंद्र औटी, द्वितीय - शिवानी विजय इंगळे, तृतीय - संतोष गोकूळदास जगताप.
गट अ) उत्तेजनार्थ - शेख अंजुम हबीब, पठाण लजीना गुलजार, खताळ कविता लालू, लाटे भारती सुनील, पठाण जुबेर जाकिर, आकांक्षा मोहन आडोळे, ऋतुजा बाळासाहेब बेल्हेकर, गाढवे ऋतुजा चंद्रकांत, भुसारी ऋषिकेश जालिंदर, अलनुर असिफ तांबोळी, शुभम सोमनाथ कांबळे, प्रसाद विकास जगदाळे, बाचकर कांचन प्रतिभा, ठुबे सिद्धेश ज्ञानदेव, जुवाळे मानसी मंगेश, पठाण झेबा रफिकखान, तांबे अनिकेत दादाभाऊ.
गट ब)उत्तेजनार्थ - अंकिता कचरु शिंदे, सय्यद शाजेब आलम, रुकय्या राजमोहंमद शेख, शेंडगे सुहास पोपट, प्रसाद आसाराम कोळेकर, ज्योती ज्ञानदेव ठुबे, प्रदीप भास्कर जाधव, डॉ.जुबेर गफ्फार शेख, सुरेश महादू गायकवाड, संदिप कडूभाऊ तांबे, नसरिन सलमान शेख, सय्यद आमिन गुलाबभाई, शेख सुहान हंसराज, अक्षदा दत्ता वडवणीकर, खिलारी पुनम मच्छिंद्र, लांडगे आयशा आमिन काशिप, शाहिन सादिक मोमिन.
गट क) उत्तेजनार्थ - अदित्य दत्तात्रय वडवणीकर, लतिफ बालराजे, केदार अनुराधा विनायक, गणेश धोंडाभाऊ भालेराव, शेख शाहिस्ता हमीद, प्रतिक दत्तात्रय क्षीरसागर, ढवळे निता जगदीश, डॉ.तृप्ती सुदर्शन हंबीरे, प्रियंका मुरलीधर सुपेकर, अ‍ॅड.महेंद्र दादासाहेब शिंदे, शिंदे अशोक चंद्रभान, सलिमखान चाँदखान पठाण, डॉ.माया नारायण लहारे, हरेश संपत शेळके, शिरिन तन्वीर शेख आदि विजेत्यांना परितोषिके देण्यात आली. 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा