वेरूळ लेण्या म्हणजे स्थापत्यकलेतील आश्चर्य – डॉ. संजय पाईकराव

युनोस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केलेल्या वेरूळ लेण्या या भारताचे खरे वैभव असून  बौद्ध, हिंदुआणि जैन धर्मातील एकत्र लेणी असणारे जगातील एकमेव लेणी संकुल आहे. स्थापत्य तसेच चित्रकलेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या लेण्यांचा उल्लेख ज्ञानेश्वरी ग्रंथात ५० वेळा केलेला आहे. वेरूळ लेण्यांचा अभ्यास भारतीयांपेक्षा परदेशी इतिहासकारांनी जास्त प्रमाणात केला असून या लेण्या आलेल्या पर्यटकांशी मूक संवाद साधण्याचे काम करतात असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती अभ्यासक प्रा. डॉ. संजय पाईकराव यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात इतिहास विभागाने आयोजित केलेल्या वेरूळ लेण्यातील कला व स्थापत्य या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अँड. सुरेशराव आव्हाड तर व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, इतिहास विभागप्रमुख डॉ. अशोक कानडे, डॉ. सुभाष शेकडे आदी उपस्थित होते. डॉ. संजय पाईकराव पुढे म्हणाले, भारतात कोरलेल्या एकूण २००० असुन लेण्यांपैकी १२०० लेण्या ह्या भारतीय पुरातत्त्व खात्याने त्याचे दस्तऐवजी करण केले आहे.  त्यापैकी ८०० लेण्या महाराष्ट्रात आहेत. जगात ३ मजली लेण्या या फक्त वेरूळ येथेच आढळतात. कैलास लेणी ही एकाच दगडात कोरलेली असून रामायण व महाभारतातील अनेक प्रसंग या लेण्यांमध्ये रेखाटलेले आहेत. कार्मेल बर्कसेन यांनी म्हणूनच कैलास मंदिर हे जगातील आठवे आश्चर्य आहे असे म्हटले आहे. जगातील पुरातत्त्वशास्त्रांना विस्मय वाटणारी बाब म्हणजे या विशाल लेण्या केवळ मानवी हातानी बांधण्यात आल्या आहेत. कैलास मंदिराची विशालता आणि परिपूर्णता बघता ते कसं उभारलं असेल याची कल्पना करणे ही माणसांसाठी आव्हानात्मक आहे. महाराष्ट्राला लाभलेला हा जागतिक वारसा अनन्यसाधारण असून तो पुढील पिढीसाठी आपण सर्वांनी जतन केला पाहिजे असे ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ. अशोक कानडे, सुत्रसंचालन डॉ. अर्जुन केरकळ तर आभार प्रा. सुरेखा चेमटे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा