देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रबोधन मेळावा संपन्न

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) : आपले घर,आपले अंगण, आपले कुटुंब, आपले गांव, स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो म्हणजेच आपला देश स्वच्छ ठेवण्याचे काम आपण महिला करतो,घरचे काम सांभाळून बचत गटांच्या माध्यामातून आपल्यातील कलागुणांना वावही देता येतो, त्यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रोत्साहन देते, ही महिलांसाठी भूषणावह बाब आहे, असे मत देवळाली प्रवराच्या सब पोस्टमास्तर श्रीमती व्ही.एस.जोशी यांनी व्यक्त केले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गटांच्या सदस्या व स्वच्छता कामगार महिलांचा प्रबोधन मेळावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात डॉ.रेणुका मासाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी अजित निकत, वैद्यकीय अधिकारी डॉ.जाकिर शेख, माझी वसुंधरा चे पर्यावरण दूत हसन सय्यद,कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके इ.मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना सहा. पोस्टमास्तर श्रीमती जोशी म्हणाल्या कि, महिलांनी आर्थिक सक्षमते बाबत जागरूक राहायला हवे, त्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा फायदा घ्यायला हवा. मुख्याधिकारी अजित निकत बोलतांना म्हणाले कि,‘महिला सक्षमीकरणासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषद नेहमीच पुढाकार घेत असुन महिलांनी काही उद्योग, व्यवसाय उभे करावयाचे ठरविल्यास सहकार्य करण्यात येईल, डॉ.जाकिर शेख यांनी शासनाच्या वैद्यकीय शिबिराची माहिती देऊन आरोग्य बाबतीत जागरूक राहण्याचे आवाहन केले. डॉ.रेणुका मासाळ यांनी स्त्रियांचे आरोग्य तसेच आहार-विहार यावर मार्गदर्शन केले. पर्यावरणदूत हसन सय्यद यांनी माझी वसुंधरा अभियान विषयक माहिती दिली. त्रिंबकराज वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा सुजाता मुसमाडे यांनी महिलांना हरित शपथ दिली. स्वागत समुदाय संघटिका सविता हारदे यांनी स्वागत केले. सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. सहा.ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित महिलांना पेरू,आंब्याचे रोप,कापडी पिशवी,माहिती पत्रकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजविकास संस्थेच्या कमल मुसमाडे, जयश्री येवले, अनिता म्हस्के, कमल संसारे, शोभा कुलट, मिराबाई भालेकर, शालिनी गायकवाड, मुन्ना चावरे, अनिता कदम, अंगणवाडी सेविका शर्मिला रणधीर, शहर समन्वयक उदय इंगळे, सोमनाथ सूर्यवंशी, नंदू शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा