मोहंमदीया एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन-------------------------------------------देशाचे रुपांतर राष्ट्रात करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले - प्रा.डॉ.अब्दुस सलाम

मोहंमदीया एज्युकेशन सोसायटी तर्फे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
-------------------------------------------
देशाचे रुपांतर राष्ट्रात करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले 
- प्रा.डॉ.अब्दुस सलाम
-------------------------------------------
नगर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत नामक महाकाय देशातील करोडो लोकांना एकासूत्रांत बांधण्याचे अशक्यप्राय कर्तुत्व केले. भारतातील विविध धर्म, अगणित जाती-पोटजाती, असंख्य भाषा-पोटभाषा, भौगोलिक आणि राजकीय विविधता, धर्मांनी प्रस्तावित केलेले धर्मग्रंथ, त्या अनुषंगाने निर्माण झालेले सांस्कृतीकस्तर आणि पेहराव या सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर यांनी केेले.
मोहमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, मासुमिया डी.एल.एड्.कॉलेज व मासुमिया बी.एड्. कॉलेज, मुकुंदनगर, अहमदनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर हे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अध्यक्षांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सय्यद फरहाना,मुख्याध्यापक सय्यद नौशाद,नाजेमा जुल्फेकार, सोलापुरे नाहीद,नाजेमा इकबाल, महागामी अफशा, शेख अ.हसीब,खतिजतुल कुबरा,फरहाना शेख,असलम पटेल,शाहीन शेख,मुमताज शेख,हिना शेख,सुलताना शेख,यास्मिन शेख व इतर शिक्षिका उपस्थित होते.
छात्रशिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन सय्यद बहार यांनी केले. सुत्रसंचालन सय्यद तलमीज यांनी केले. व आभार जागिरदार फरीदा यांनी मानले. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा