भाषेतील गोडवा समजुन घेऊन भाषा कौशल्य आत्मसात केल्यास कोणत्याही स्पर्धेला समोरे जाऊन यश संपादन करता येऊ शकते, त्यासाठी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत* असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे,न्यू आर्टस् ,कॉमर्स अॕण्ड सायन्स कॉलेज,शेवगाव येथे वाड:मय मंडळ आयोजित " भाषिक कौशल्ये विकास कार्यशाळेच्या "समारोप समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, अहमदनगर येथील न्यू आर्टस् ,कॉमर्स ॲण्ड सायन्स काॕलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बाळासाहेब सागडे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक,सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे हे होते.
"भाषा-साहित्य आणि समाज " यांचा अनुबंध सहजरित्या उलगडण्यासाठी भाषिक कोशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे ,असा अशावाद ही सुनील गोसावी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
" भाषिक कौशल्ये हे दैनंदिन जीवन व्यवहारातूनच आत्मसात होत असतात.श्रवण-चिंतन - मनन आणि वाचन-लेखन - संभाषण हे कौशल्ये चिकाटी,जिद्द,सातत्य यामुळे सहजच अंगी उतरतात.फक्त मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास पाहिजे असतो.असे अनेक संदर्भासह प्रा.डॉ.सागडे यांनी उलगडून दाखवले.पञकार भगवान राउत यांनीही पञकारिता आणि भाषा यांचा अनुबंध आपल्या मनोगतातून अभिव्यक्त केला.
डॉ.रविंद्र वैद्य,डॉ.गोकुळ क्षीरसागर,डॉ.अनिता आढाव,प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे,डॉ.हेमंत गायकवाड यांनी सात दिवस विशेष मार्गदर्शन केले.वाङ:मय मंडळ प्रमुख प्रा.डॉ.वसंत शेंडगे यांनी कार्यशाळा चे अत्यंत वेधकतेने संयोजन केले.प्रसंगानुरुप प्रा.आशा वडणे,प्रा.राहुल ताके,प्रा.राम कोरडे',प्रा.राम केदार,प्रा.सोपान नवथर यांनी प्रास्ताविक, आभार, सूञसंचालन आणि परिचयात्मक भूमिका पार पाडल्या.सात दिवसाच्या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मनोगते व्यक्त झाली व सर्वांना प्रमाणपञ देवून सन्मानीत करण्यात आले.
إرسال تعليق