इदारा अदबे इस्लामी महाराष्ट्राच्या वतीने वार्षिक उर्दू साहित्य परिषद संपन्न---------------------------------------------पुरस्कार, पुस्तक प्रकाशन, व्याख्यान व मुशायराला रसिकांचा प्रतिसाद

अहमदनगर- इदारा अदबे इस्लामी महाराष्ट्राच्या वतीने एक दिवसीय वार्षिक उर्दु साहित्य परिषद सर्जेपुरा अहमदनगर येथील रहमत सुलतान सभागृहात संपन्न झाली. मुश्ताक अहमद यांच्या कुराण पठनाने परिषदेची सुरुवात झाली. दिल्ली येथील साहित्यकार इंतजार नईम यांनी पहिल्या सत्राचे अध्यक्षपद भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून जमात-ए-इस्लामी हिंदीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रिजवानुर्रहमान खान व महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शोएब हाशमी उपस्थित होते. यावेळी इदारा अदबे इसलामीचे सेक्रेटरी गुलाम फरीद यांनी प्रास्ताविक करताना संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.दरवर्षी उर्दू साहित्यातील योगदानाबद्दल दोन पुरस्कार दिले जातात. त्यापैकी यावर्षी ‘हाफीज़ मिराठी पुरस्कार’ त्रिमासिक असबाक पुणेचे संपादक डॉ.नज़ीर फतेहपुरी यांना तर ‘अस्मत जावेद पुरस्कार’ औरंगाबादचे साहित्यकार डॉ.अजीम राही यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तीस हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल व प्रमाणपत्रच्या रूपात प्रदान करण्यात आले. यावेळी अकोला येथील कवी अनीस नबील यांच्या काव्य पुस्तक ‘सरमाये तन्हाई’ या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना शोएब हाशमी म्हणाले की, इदारा अदबे इसलामी च्यावतीने चांगले उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास उर्दु अ‍ॅकडमीची मदत घेऊ शकतात त्यासाठी सहकार्य करु, असे सांगितले. तर जमाते इस्लामीचे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहमान खान म्हणाले की,संघटनेचा विस्तार अजुन राज्यभर पसरून या साहित्यिक लोकांना व्यापकता देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. साहित्यिकांनी यासाठी इदारा अदबे इस्लामीशी जुळून सहकार्य करावे, असे आवाहन केले. 
एका प्रतिष्ठित राष्ट्रीय महत्त्व असणार्‍या संघटनेकडून मिळालेल्या पुरस्काराबद्दल पुरस्कारार्थींनी विशेष आनंद असल्याचे नमूद केले. तर कवी अनीस नबील यांनीही पुस्तक विमोचानाबद्दल अदबे इस्लामीचे आभार व्यक्त केले.
परिषदेच्या दुसर्‍या सत्रात निबंध वाचन झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी इदारे अदबे इस्लामीचे अध्यक्ष प्रा.मकबूल अहमद (उदगीर) हे होते. यामध्ये कोरोना व उर्दू ईनशाइया, उर्दू शायरीत कोरोना, नज़ीर फतेपुरींची कोरोनाई कहानिया यावर डॉ. काझी नवेद अहमद (औरंगाबाद), खान हसनैन आकीब (पुसद), डॉ. मोहम्मद अजमतुलहक्क (देगलूर), यांनी निबंध सादर केले. तर प्रा.याहया जमाल (अमरावती) यांच्यावतीने मोहम्मद सलाहुद्दीन सिद्दिकी (औरंगाबाद) यांनी त्यांचा निबंध सादर केला. 
शेवटचे सत्र मुंबई येथील साहित्यिक व पत्रकार डॉ. सलीम खान यांच्या अध्यक्षतेत अफसाना (कादंबरी) वाचनावर झाले. यामध्ये मोईनुद्दीन उस्मानी (जळगाव), डॉ.अजीम राही (औरंगाबाद), ख्वाजा मसीहुद्दीन अबु नबील (हैदराबाद), खान हसनैन आकीब (पुसद), व डॉ. सायम सिद्दीकी (औरंगाबाद) यांनी आपले अफसाने सादर केले. 
रात्री औरंगाबाद येथील उर्दू साहित्यकार असलम मिर्झा यांच्या अध्यक्षतेत ऑल इंडिया मुशायरा झाला. दिवसभर चाललेल्या या उर्दु साहित्य परिषद यशस्वी करण्यासाठी इदारा अदबे इस्लामीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा