सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ग्रंथ पुरस्कार घोषित

अहमदनगर :  (वार्ताहर )येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त  सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रबोधन उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
   अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील राम गोसावी यांच्या 'आठवणींचा डोह 'ह्या आत्मपर ग्रंथास हा पुरस्कार घोषित करण्यात आला, राष्ट्र सह्याद्री मध्ये माझ्या मनातल या लेखमाला द्वारे सुनील गोसावी यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला होता,तब्बल साडेतीन महिने चाललेल्या याच लेखमालेचे आठवणींचा डोह हे पुस्तकं नुकतेच पदमश्री  पोपटराव पवार,आमदार लहू कानडे,कॉ भालचंद्र कांगो,प्रा डॉ प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आहे,
   प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक माजी प्राचार्य टी. ई. शेळके, संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये,उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे,  कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये,ग्रंथ परीक्षक डॉ. शिवाजी काळे,डॉ. रामकृष्ण जगताप, उपाध्यक्ष संगीता फासाटे, प्रा. शिवाजीराव बारगळ आदिंच्या उपस्थितीत हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
लवकरच सदर पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, यांच्या सह सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा