रंग आयुष्याचे आणि कंपन जीवनाचे वास्तव मांडणारी पुस्तक - कविवर्य सुभाष सोनवणे स्वाती गोसावी लिखित पुस्तकांचे प्रकाशन

अकोले जि.अहमदनगर (प्रतिनिधी)-
 *रंग आयुष्याचे आणि कंपन ही मानवी जीवनाचे वास्तव मांडणारी व दैनंदिन जीवन जगत असताना आसपास घडणाऱ्या घटना प्रसंगातील व्यापक निरीक्षणातून निर्माण झालेल्या कथा कवितांची पुस्तके असून त्यांना ग्रामीण लेखनशैलीचा बाज* असल्याचे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्याध्यक्ष कविवर्य सुभाष सोनवणे यांनी केले.
      स्वाती गोसावी लिखित रंग आयुष्याचे आणि कंपन या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ अकोले महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरे पाटील यांच्या अध्यक्ष तेखाली संपन्न झाला.यावेळी विचारपीठावर  एस.पी. देशमुख,प्राचार्य डॉ. भास्करराव शेळके, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार, गिरजाजी जाधव,बाळासाहेब भोर, बाळासाहेब दोरगे, राजेश पावसे,अनिल गायकवाड,हेरंब कुलकर्णी,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,भाऊसाहेब कासार,शर्मिला गोसावी,एस.बी.जाधव, भामा गोसावी, भाऊसाहेब पुरी,रेश्मा कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी बोलताना सुभाष सोनवणे पुढे बोलतांना म्हणाले की,   'शिक्षिका म्हणून काम करताना आजूबाजूच्या घटनांच्या नोंदी ठेवत मनाच्या गाभाऱ्यात शब्दांची साठवण करून त्यातून निर्माण झालेले त्यांचे जीवननिष्ट अनुभव मांडतात. अनुभवाचं विश्व खूप मोठं असल्याची जाणीव या पुस्तकातून होते'. यावेळी बोलताना जे.डी. आंबरे पाटील म्हणाले इंग्रजी विषयाच्या शिक्षिका असूनही त्यांनी मराठी साहित्य रूपानं केलेलं लेखन हे उल्लेखनीय आहे, त्यांच्या शालेय जीवनातील कौटुंबिक जीवनातील विविध अनुभव त्या आपल्या साहित्यातून प्रामाणिकपणे मांडताना दिसून येतात. प्राचार्य डॉ.शेळके बोलताना म्हणाले,एखादी स्री माहेराला येऊन ज्या प्रमाणे आपलं मन मोकळं करते अगदी तीच सहजता स्वाती गोसावी यांच्या साहित्यातून दिसून येते. यावेळी पो.नि.पांडुरंग पवार,संस्थेचे खजिनदार एस.पी.देशमुख, घनश्याम माने,सुनील गोसावी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी मुखपृष्ठकार मीनानाथ खराटे व सुजित नवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत डॉ.नितीन आरोटे यांनी केले तर प्रास्ताविक शब्दगंधच्या राज्य संघटक,कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.कामाजी जाधव यांनी तर आभार शिवराम भोर यांनी मानले. कार्यक्रमास शैक्षणिक व  साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वाती गोसावी यांचा विविध संस्था,संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब पुरी,संदिप गोसावी,राम गिरी सर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा