श्रीरामपूर (प्रतिनिधी) -एकदा मनाचा निश्चय केला की कोणतेही कार्य तडीस नेता येऊ शकते. याची प्रचिती देणारी घटना श्रीरामपुरात घडली आहे. येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिका शाळा क्रमांक सहा च्या पदवीधर शिक्षिका सौ लता पोपटराव वाघचौरे उर्फ लता दत्तात्रय औटी यांनी सलग तिसऱ्या वर्षी पवित्र रमजान महिन्याचे पूर्ण महिन्याचे रोजे पूर्ण करून एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे.
लता औटी यांना बालपणापासूनच रोजे धरण्याची सवय आहे. यासाठी घरातून त्यांना प्रोत्साहन देखील मिळत होते. कधी दोन, कधी चार, कधी दहा तर कधी वीस रोजे त्या दरवर्षी करीत होत्या. काही वर्षापूर्वी त्यांनी पूर्ण महिनाभराचे रोजे करण्याचा संकल्प केला .पहिल्या वर्षी त्या यशस्वी झाल्या. त्यानंतर गेल्या वर्षी व यावर्षी सुद्धा त्यांनी रमजानचे पूर्ण महिन्याचे रोजे केले. त्यांच्या या यशाबद्दल समाजामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे .
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की दोन वर्षांपूर्वी मला कोरोना झाला होता त्यामुळे माझे अन्न कमी झाले होते. वजन वाढलेले होते म्हणून मी रोजे अर्थात उपवास करण्याचा निश्चय केला आणि सलग पंधरा तास काहीही न खाता-पिता मी रमजान महिन्यातील रोजे पूर्ण केले. परिणामी माझे वजन खूप कमी झाले तसेच कामामध्ये उत्साह वाढला. मी दररोज सायकलीवर श्रीरामपूर ते देवळाली असे 28 किलोमीटर सायकलिंग करते तसेच पायी फिरते. त्यामुळे देखील मला खूप फायदा झाला. रोजे केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी झाली व शरीरांमध्ये उत्साह संचारला. कामामध्ये उत्साह वाढला. गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनानंतर मला कोणताही आजार आजपर्यंत झालेला नाही. रोजे शरीर शुद्धीसाठी उत्तम आहे याची प्रचिती मला आली. त्यामुळे मी श्रद्धेने आणि उत्साहाने यावर्षी देखील रोजे पूर्ण केले. कडक ऊन असताना सुद्धा मी हा संकल्प केला. सुरुवातीचे एक-दोन दिवस जाणवले. नंतर मात्र काही ही त्रास झाला नाही.
लताबाई यांनी सलग तिसऱ्या वर्षी महिनाभराचे रोजे पूर्ण केल्याबद्दल नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख,समीना शेख, मुख्तार शाह, ताराचंद रणदिवे, कलीम कुरेशी,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, फारुक शाह, वहिदा सय्यद, आसिफ मुर्तजा, मिनाज शेख,अस्मा पटेल, नसरीन इनामदार, शाईन शेख, बशिरा पठाण, निलोफर शेख, नाजिया शेख, जमेल काकर, एजाज चौधरी, रजिया मोमीन, सलमा शेख, सफिया शेख, यास्मिन शेख, परवीन शेख, अलताफ शाह, निशात पठाण, रिजवाना पठाण, शगुफता खान,समीना शेख, शगुफता बागवान,कौसर काझी, फराह बागवान आदिंनी अभिनंदन केले आहे.त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लता औटी फोन नंबर -
9403231432
إرسال تعليق