जेष्ठ समाजसेविका व मेडिकल सोशल वर्कर गायत्री सज्जन व संजय सज्जन यांनी नेवासा - खडका रोड वरील मुकींदपूर येथील शरणपूर वृद्धाश्रमास भेट दिली

नेवासाफाटा (प्रतिनिधी): *ज्येष्ठ नागरिकांच्या भावना समजावून घेऊन त्यांना मायेच्या हळव्या मनाने प्रेमळपणे सांभाळणे अतिशय अवघड काम असुन ते रावसाहेब मगर व त्यांचे सर्व सहकारी शरणपुर वृध्दआश्रमात करत आहेत, हे पाहून अतिशय आनंद वाटला* असे प्रतिपादन मुंबई येथील जीवन वृक्ष ट्रस्ट च्या कार्यकारी संचालक गायत्री सज्जन यांनी केले.
     जेष्ठ समाजसेविका व मेडिकल सोशल वर्कर गायत्री  सज्जन व संजय सज्जन यांनी  नेवासा -  खडका रोड वरील मुकींदपूर येथील शरणपूर वृद्धाश्रमास भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी झालेल्या छोटेखानी समारंभाचे अध्यक्षस्थानी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जीवन वृक्ष ट्रस्ट चे संचालक संजय सज्जन, मँगो चे अध्यक्ष डॉ. रमेश वाघमारे,मूकबधिर विद्यालयाच्या समाजसेविका तेरेजा भिंगारदिवे इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजय सज्जन यांनी वृध्दाश्रमातील आजी आजोबांशी हितगुज साधून वृध्दाश्रमातील आजी आजोबांसाठी कॅरम,टाळ,व पत्याचा कॅट,डत्यादी वस्तु पुढील भेटीत देण्यार असल्याचे सांगितले.
 यावेळी वृध्दाश्रमातील आजी आजोबांसाठी पाण्याची टाकी व स्टँड करीता दहा हजार रूपयाचा चेक प्रदान केला.
 सुनील गोसावी अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले की, *शरणपूर वृध्दाश्रमाचे नावं सर्वदूर झाले असुन जेष्ठ नागरिकांना येथे सर्व सुखसोयी व सुविधा उपलब्ध असल्याने ते उत्साहवर्धक दिसत आहेत, त्यामुळे समाधान वाटते*
        डाॅ.रमेश वाघमारे, तेरेजा भिंगारदिवे यांनी शुभेच्छा देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शरणपूर वृद्धाश्रमाचे संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर,सचिव सुरेखाताई मगर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा