शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान च्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान

येवला (प्रतिनिधी) : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक च्या वतीने शहादू वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार  साहित्यिकांच्या कवितासंग्रह, कथासंग्रह, गझल संग्रह, आणि कादंबरी अशा चार साहित्य कलाकृतीला देण्यात आले, यासाठी महाराष्ट्रातून  ७० प्रवेशिका आल्या होत्या, पुरस्कार वितरण माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक गो.तू पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक च्या माजी जिल्हा परिषद् अध्यक्षा मायाताई पगारे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, कार्यवाह सुभाष सोनवणे, जेष्ठ साहित्यिका विमलताई वाणी, परीक्षक संजय पठाडे, साईनाथ पाचारणे, रिता जाधव, नामदेव काशीद, स्वाती ठुबे, प्राचार्या डॉ.गुंफाताई कोकाटे व अभिनव खानदेश चे संपादक प्रभाकर सुर्यवंशी हे होते. 
         माणसाच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी साहित्य महत्वाचे साधन आहे, एकांतात चिंतन मनन करून,पेन कागद जवळ ठेवून आपल्या मनातील भावना आपण साहित्यातून व्यक्त करतो तेव्हा खूपच समाधान वाटते, असे विचार माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले
      या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाप या विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या,
स्वागत प्रास्ताविक प्रशांत वाघ यांनी केले सुत्रसंचलन कवयित्री शर्मिला गोसावी व रविंद्र मालुंजकर यांनी केले.
या प्रसंगी काव्यलेखन स्पर्धेत विज्येत्या स्पर्धकांना पारितोषिक  देऊन गौरविण्यात आले.
      यावेळी  झालेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गझलकार  राम गायकवाड हे होते, गीतांजली वाबळे. सुवर्णलता गायकवाड, सुनीता बहिरट,अरविंद शेलार , संजय ओहळ, विजय लोंढे, कारभारी बाबर, आनंदा साळवे, बाळासाहेब गिरी यांचेसह महाराष्ट्रातील नागपुर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, अहमदनगर, नांदेड, जळगाव, मुंबई, सह विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने  साहित्यिक उपस्थित होते.
 संजीवनी उद्योग समुहातील संजय वाघ, साहित्यिक प्रशांत वाघ, देशसेवेत कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी राजेश वाघ यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या आठवणी पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा