श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील सहायता एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित मदरसा हुदेबिया लिलबनात या मुलींच्या मदरसाच्या नविन इमारतीचा भूमिपूजन (संग ए बुनियाद ) समारंभ लखनऊ येथील मदरसा नदवाच्या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू व मदरसा नदवतुल उलेमा चे प्रमुख हजरत मौलाना सईदुर्रहमान आजमी साहब यांचे शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
अध्यक्षस्थानी जामा मस्जिद नदवातुल उलेमा चे खतीब व इमाम मौलाना फरमान नदवी हे होते.यावेळी शहर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख उलेमा, हाफिज व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हजरत मौलाना सही दूर रहमान साहब आजमी यांनी नवीन इमारतीसाठी दुवा केली तसेच या इमारतीमुळे शहरातील मुलींच्या धार्मिक शिक्षणाची चांगली सोय होणार आहे एक आदर्श समाज निर्मितीसाठी मुलींनाआले शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण देणे सुद्धा आवश्यक आहे माता पत्नी मुलगी ही सर्व नाती निभावताना समाज निर्मिती साठी आवश्यक असणारे सर्व गुण मुलीं मध्ये येण्यासाठी त्यांना धार्मिक शिक्षण देणे आवश्यक आहे श्रीरामपूर सारख्या छोट्या गावांमध्ये अशा प्रकारे मुलींसाठी स्वतंत्र पहिला मदर्सा यानिमित्ताने निर्माण झाला आहे भविष्यात येथून चांगले शिक्षण घेऊन मुली आपल्या जीवनामध्ये आदर्श जीवन प्रणाली लागू करण्यासाठी आपले योग्यदान देतील असे ही ते म्हणाले.
प्रास्ताविक भाषणामध्ये मदरसा हुदेबिया लिलबनात चे प्रमुख मुफ्ती मोहम्मद रिजवान यांनी नवीन इमारतीची माहिती दिली. पाच हजार स्क्वेअर फुटाचा या इमारतीमध्ये मुलींसाठी अभ्यासाचे स्वतंत्र वर्ग तसेच अतिथी गृह राहणार आहे.शहर व परिसरातील मुलींच्या धार्मिक शिक्षणासाठी अल्पावधीत मध्ये लोकप्रिय ठरलेल्या या मदरशांमध्ये मोठ्या संख्येने मुली प्रवेश घेतात. मात्र जागे अभावी सर्वांना प्रवेश देता येत नाही. नवीन इमारती मुळे ही अडचण दूर होणार आहे.सर्व दानशूर व्यक्तींनी इमारतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
लखनऊ येथील मदरसा नदवतुल उलेमाचे अरबी विभागाचे प्रमुख व श्रीरामपूरचे भूमिपुत्र मुफ्ती अब्दुल्लाह यांनी ही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून या मदरसा साठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी मान्यवर उलेमांच्या शुभहस्ते शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी बहुमोल सहकार्य केले. शेवटी आदिल मखदुमी यांनी आभार मानले.
إرسال تعليق