उर्दू शाळा क्रमांक पाच चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या येथील परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच चा ३६ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने शाळेचे माजी शिक्षक व माजी गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे हे होते. व्यासपीठावर नगरसेवक मुक्तार शाह, कलीम कुरेशी, उम्मती सोसायटीचे अध्यक्ष सोहेल दारूवाला, सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा, हाजी जलीलभाई काझी, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रज्जाक पठाण, विद्यमान अध्यक्षा तरन्नूम मुनीर शेख, माजी नगरसेवक निसारभाई कुरेशी, सरवरअली सय्यद, पत्रकार लालमोहम्मद जहागीरदार, मोहसीन पठाण, मोहसीन शेख, दानिश पठाण, वसीम कुरेशी, एकता यंग सर्कलचे तौफिक शेख, केजीए उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका महेजबीन खान, नाहिद शेख, फहेमिदा शेख,गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे,जिल्हा संघटक दीपक शिंदे,मुख्याध्यापिका नाझिया शेख, रजिया मोमीन आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेच्या माजी मुख्यध्यापिका श्रीमती सफिया बाहोद्दीन राजे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या शाळेचे माजी विघार्थी मोहसीन पठाण,वसीम कुरेशी,दानिश पठाण, महेवीश पठाण,सहेर पटेल,नुशरा महेबुब आदिंचा ही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. शाळेच्या समर कॅम्प मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा सादर केला. ३५ वर्षात शाळेतून सुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले असून ते विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. शाळेमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशासन अधिकारी पटारे यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करताना शाळेमध्ये सर्व गोरगरीब समाजातील विद्यार्थी असले तरी गरिबी शिक्षणात अडथळा ठरू शकत नाही. गरीब घरात देखील हुशार विद्यार्थी असतात. गुणवत्ता असेल तर लोक मदत करतात. शाळेचा स्टाफ अतिशय मेहनत घेतो आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव धडपड करीत असतो असे सांगून भविष्यातही चांगले विद्यार्थी या शाळेतून घडावेत असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी नगरसेवक मुख्तार शाह, साजिद मिर्झा, बाळासाहेब सरोदे,सोहेल दारूवाला, वसीम कुरेशी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रस्ताविक श्रीमती शाहीन शेख, सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ,तर आभार फारुक शाह यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक सर्वश्री फारुख शाह, वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, अस्मा पटेल, निलोफर शेख, बशीरा पठाण, आसिफ शेख, मिनाज शेख, एजाज चौधरी,यास्मिन पठाण, जुनेद काकर, रिजवाना कुरेशी, उजमा पीरजादे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा