रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने "२१ वे मोफत प्लॉस्टिक सर्जरी शिबीर" दिनांक १९-२० सप्टेंबर २०२२ रोजी सिव्हिल हॉस्पिटल,पत्रकार चौक, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याचे किशोर मुनोत,ट्रस्टी - चांदमल मुनोत ट्रस्ट,डॉ दर्शना तुकाराम धोंडे (बारवकर) - जिल्हा शल्य चिकित्सक (प्रभारी), डॉ विक्रमसिंह पडोळे - अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक (प्रभारी), आदेश चंगेडिया व प्रशांत गांधी,भारतीय जैन संघटना, अहमदनगर यांनी कळविले आहे.
या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओंठ, चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण व डाग, नाक व कान यावरील बाहयव्यंग, पापण्यातील विकृती अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत.विश्वविख्यात प्लॉस्टिक सर्जन स्वर्गीय डॉ.शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांच्या समरणार्थ त्यांचे अमेरिकेतील शिष्य डॉ राज लाला, डॉ ललिता लाला व त्यांचे सहकारी डॉक्टर्स यांच्या मार्फत हा मानवसेवेचा महायज्ञ अनेक वर्षांपासून चालू ठेवण्यात आला आहे. अहमदनगर मधून डॉ नूतन फिरोदिया आणि केतन बलदोटा शिबीर सहप्रमुख म्हणून त्यांना सहकार्य करणार आहेत. या शिबिरामध्ये अंदाजे १०० ते २०० रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हे शिबीर जरी दोन दिवस चालणार असले तरी रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त सोमवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी या एकाच दिवशी सकाळी ९.०० ते ०२.०० होणार असून उर्वरित वेळी शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.
Post a Comment