अहमदनगर - खिदमत-ए-हुज्जाज कमिटी अहमदनगर तर्फे 2023 मध्ये हजला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी फार्म उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक जण सामंजस्यामध्ये आहे. त्यासाठी खिदमत-ए-हुज्जाज कमिटी अहमदनगर तर्फे सांगण्यात आले की लवकरच हज कमिटीतर्फे फार्म निघू शकतात. तरी हजला जाऊ इच्छिणाऱ्या हाजींनी 31डिसेंबर 2023 पर्यंत वैद्य असणाऱा पासपोर्ट, बॅग्राऊंड व्हाईट असलेले पासपोर्ट फोटो, ब्लड ग्रुप, कव्हर हेड ची सेविंग अकाउंट पासबुक, कॅन्सल चेक, आधार कार्ड, नाॅमीणीचे नाव व मोबाईल नंबर, कोविड वॅक्सिंन सर्टिफिकेट ( फॉर्म निघाल्यावर कळेल ) कव्हर हेडचे मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रे तयार करून ठेवावे. फाॅर्म उशिरा आल्यास कागदपत्रे जमा करायला वेळ कमी मिळू शकतो. म्हणून सर्वांनी आत्ताच या सर्व बाबी तयार ठेवावी. काही अडचण असल्यास डॉ. रिझवान अहमद शब्बीर 90 96 79 75 67 किंवा जुनैद शेख यांच्याशी 950 313 78 62 यांच्याशी संपर्क करावे. असे आवाहन खिदमत-ए-हुज्जाज कमिटी अहमदनगर तर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment