अहमदनगर - स्वत:चे राहणीमान व समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आज पुढे जाण्याची जिद्द वाढत आहे. पण खर्या अर्थाने समाजातील गरजूंच्या मदतीसाठी जिद्द निर्माण होण्याची फार आवश्यकता आहे. आपल्या आनंदी क्षणी त्यांची आवठण ठेवून त्यांना मदतीचा हात देऊन आपला आनंदही द्विगुणित करु शकतो. दुसर्याला देण्याचा जो आनंद आहे, तो इतर कोणत्याही गोष्टीत नाही. त्यासाठी वंचितांसाठी आपण थोडा वेळ व मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता अल्तमश जरीवाला यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ता साहिल सय्यद यांच्या वाढदिवसा निमित अहमदनगर युवा फाउंडेशन तर्फे तपोवनरोड येथील बालघर मध्ये सामाजिक उपरक्रमाने आनाथ आणि वंचित मुलांन सोबत साजरा करण्यात आला.यावेळी साहिल सय्यद यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ता अल्तमश जरीवाला, साजिद सय्यद, अझीम शेख, हासिब खान, शाहिद शेख, आरीफ शेख, नूर सय्यद, वाहिद शेख, पवण गवारे, युवराज गुंड आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना जरीवाला म्हणाले की समाजामध्ये दिवसेंदिवस गरीब-श्रीमंत ही दरी वाढत चालली आहे. त्यामुळे वंचितांच्या समस्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अशावेळी वाढदिवसानिमित्त वंचितांना अन्नदान, गरजेच्या वस्तू वाटप करण्याचे कार्य नक्कीच प्रेरणादायी असून, याचे सर्वांनी अनुकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment