श्रीरामपूर - *येथील प्रकाश किरण प्रतिष्ठान च्या वतीने या वर्षाचे ग्रंथ पुरस्कार आठवणींचा डोह, भारतीय कुंभार समाजातील संत, भारुड,संघर्ष श्रीरामाचा, पसंत आहे मुलगी, काजवा या ग्रंथांना जाहीर करण्यात येत आहेत अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी दिली۔
प्रकाश किरण प्रतिष्ठान गेली १५ वर्षांपासून साहित्यिकांना त्यांच्या साहित्य ग्रंथास पुरस्कार देऊन सन्मानित करतात.वाचन संस्कृती वाढावी,वाचनाची गोडी निर्माण व्हावी, अनेक लेखक ,कवी, साहित्यिक निर्माण व्हावेत , साहित्यिकांना उत्तेजन व प्रेरणा देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.यंदाचे पुरस्कारार्थी नामवंत लेखक,विचारवंत आहेत. सुनील गोसावी - अहमदनगर- आठवणीचा डोह-आत्मकथन, प्रा.डाॅ.बाबुराव उपाध्ये - श्रीरामपूर-भारतीय कुंभार समाजातील संत-समीक्षा ग्रंथ,फादर मायकल घोन्सालवीस- वसई - भारूड-अध्यात्मिक वैचारिक लेख, श्रीराम बोबडे -श्रीरामपूर-संघर्ष श्रीरामाचा - आत्मचरित्र, शरद पुराणिक - नाशिक - पंसत आहे मुलगी- विनोदी कथासंग्रह, पोपट श्रीराम काळे- पुणे -काजवा-आत्मकथन. पुरस्काराचे स्वरूप गौरव चिन्ह, सन्मान पत्र,शाल,व साहित्य ग्रंथ.
सदर साहित्यिकांचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले, उपाध्यक्ष किरण भोसले,सचिव प्रकाश भोसले, कोषाध्यक्ष सौ.विजया भोसले यांनी अभिनंदन केले. लवकरच एका समारंभात पुरस्कारार्थीना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी सांगितले.
Post a Comment