सर्जेपुरा रंगभवन सि. सर्व्हे नं. ७१८९ या महापालिकेच्या जागेवर स्वतंत्र सेनानी भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांचे स्मारक उभारण्याची मागणी
समाजवादी पक्षाच्या वतीने आयुक्त व महापौर यांना निवेदन देण्यात आले
अहमदनगर (प्रतिनिधी) - सर्जेपुरा रंगभवन सिटी सर्व्हे नं.७१८९ हि जागा महानगर
पालिकेची आरक्षण असलेली जागा आहे या जागेवर स्वतंत्र सेनानी भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्मारक उभारण्यात यावे मौलाना अबुल कलाम आझाद,यांनी 1940-45 च्या दरम्यान ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते ज्या दरम्यान भारत छोडो आंदोलन झाले.त्यावेळी त्यांना तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. त्याकाळी ऐतिहासिक अहमदनगर भोईकुट किल्ला ब्रिटीश राजांनी त्याचा तुरुंग म्हणून वापर केला यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद हे 3 वर्ष भोईकुट किल्ला येथे नजर कैद असताना यांनी प्रशंसित "गुबार-ए-खातीर" (सॅलीज ऑफ माइंड) हि पुस्तक अहमदनगर च्या धर्तीवर लिहिली स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले.त्यांनी अनेक योगदान देशासाठी दिले अश्या महान स्वतंत्र सैनानी यांचे स्मारक म्हणजे नवीन पिढीसाठी चांगले उदाहरण ठरेल तसेच यावर्षी प्रथमच आपल्या अहमदनगर महानगरपालिकेत अबुल कलाम आझाद यांची जयंती देखील साजरी करण्यात आली, सामाजिक शैक्षणिक व संस्कृतीक स्मारकाने समाजातील पदवी व शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी करिता स्पर्धा मार्गदर्शन केंद्र असलेले स्मारक अपेक्षित आहे या सर्वबाबी लक्षात घेऊन सर्जेपुरा रंगभवन सिटी सर्व्हे नं.७१८९ या जागेवर भव्य असे मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे दक्षिण जिल्हाअध्यक्ष अजीम राजे यांनी केली.
Post a Comment