अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस १ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

' अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस १ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ' अहमदनगर : आरोपी नामे सलमान उर्फ माईकल एजाज शेख , वय २७ वर्षे , रा . बेलदार गल्ली , मुकुंदनगर , अहमदनगर जि . अहमदनगर याने पिडीत फिर्यादी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात धरून ओढत डब - याकडे चल म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३५४ , ३५४ ( ब ) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम १२ नुसार दोषी धरून आरोपीस १ वर्षे सक्त मजुरी व रूपये ३,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली .सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , पिडीत मुलगी व आरोपी हे एकाच परिसरात राहणारे आहेत . वय वर्षे १४ असलेली अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिची मैत्रिणीसोबत अरबी भाषेच्या क्लासला जात असताना , आरोपी हा फिर्याद देण्याच्या एक महिना अगोदर पासून तिचा पाठलाग करत होता . दिनांक १३.०३.२०१ ९ रोजी पिडीत मुलगी हि तिच्या मैत्रीणीसोबत संध्याकाळच्या सुमारास अरबी भाषेच्या क्लास वरून पुन्हा घरी जात असताना , आरोपीने तिचा हात पकडला व पिडीत मुलीच्या सोबत असलेल्या मैत्रिणीला तेथून हाकलून दिले . त्यानंतर आरोपी पिडीत मुलीला म्हणाला की , “ माझ्या सोबत 
डब - यामध्ये चल " पिडीत मुलीने नकार दिला असता , आरोपी तिचा हात धरून तिला जोराने ओढत घेवून जावू लागला . पिडीत मुलगी ही आरोपीच्या हातातून तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत होती . परंतु आरोपी तिचा हात सोडत नव्हता . त्यावेळी पिडीत मुलीने आरडा - ओरडा केल्याने परिसरातील लोक तेथे जमा झाले नंतर आरोपी तेथून पळून गेला . सदरची घटना पिडीत मुलीने घरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितली . त्यानंतर पिडीत मुलीने तिच्या वडिलांसोबत तोफखाना पोलिस स्टेशनला जावून आरोपी विरुध्द रितसर फिर्याद दिली . घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उप निरीक्षक वैभव पेठकर यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पंच साक्षीदार , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासी अधिकारी , वयासंदर्भात मुख्याध्यापक व नगर परिषद यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की , पिडीत मुलीसोबत असलेली तिची मैत्रिण ही देखील आरोपीच्या दहशतीमुळे मे . कोर्टासमोर साक्ष देणेकामी हजर राहिलेली नाही . तसेच इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील आरोपीच्या दहशतीमुळे कोर्टासमोर येत नव्हते . यावरून आरोपी याची राहत असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत असल्याचे दिसून आले तसेच ही बाब पोलिस रिपोर्टवरून स्पष्टपणे निदर्शनास आले . त्यामुळे आरोपीस जर योग्य ते शासन झाले नाही तर आरोपीचे मनोधैर्य वाढेल व अशा प्रकारच्या घटना आरोपीकडून पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरी आरोपी विरुद्ध वय वर्षे १४ असलेली अज्ञान मुलगी खोटे का सांगेल याबाबत आरोपीच्या वकीलांनी कुठेही खुलासा केलेला नाही . तरी आरोपीस योग्य ती शिक्षा करावी . तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ , तसेच पो . कॉ . शेख यांनी सहकार्य केले . 
अहमदनगर 
ता . २०/०१/२०२३
 ( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )    

    विशेष सरकारी वकील ,
 अहमदनगर . 
मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा