अहमदनगर-शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी दोन वाजता अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे"* अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
सदर सर्वसाधारण सभेस सर्व सभासद,पदाधिकारी,हितचिंतक, मार्गदर्शक,सल्लागार यांना निमंत्रित करण्यात येतं आहे. पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करणे,संमेलनाच्या अनुषंगाने विविध समित्या स्थापन करणे, जबाबदारीचे वाटप करणे,निधी संकलन विषयी चर्चा करणे, विविध पुरस्काराबाबत चर्चा करणे,पुस्तक परीक्षण समिती तयार करणे व परीक्षण समितीकडे पुस्तके प्रदान करणे, शब्दगंध सभासदांनी मिळविलेल्या विशेष यशाबद्दल किंवा पुरस्कार बद्दल अभिनंदन करणे,यासह संमेलन यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून विषय ठेवण्यात आले आहेत. शब्दगंधच्या परंपरेनुसार सर्व सभासदांच्या मतांचा, सूचनांचा विचार या सभेत केला जाणार आहे. सभेनंतर जेष्ठ साहित्यिकांशी अनौपचांरिक गप्पा टप्पा व चहापान करण्यात येणार असून सर्व ज्येष्ठ साहित्यिकांनी यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन शब्दगंध चे कार्यवाह डॉ अशोक कानडे, भगवान राऊत खजिनदार, कार्यवाह सुभाष सोनवणे, अजयकुमार पवार, भारत गाडेकर, डॉ. गुंफा कोकाटे, डॉ. तुकाराम गोंदकर ,सुनीलकुमार धस, राजेंद्र फंड, शर्मिला गोसावी, किशोर डोंगरे, रामकिसन माने, बबनराव गिरी,स्वाती ठूबे, राजेंद्र पवार व ज्ञानदेव पांडूळे यांनी केले आहे
सुनील गोसावी, सचिव
إرسال تعليق