▫️ मख़दुम समाचार ▫️
कोपरगाव (प्रतिनिधी) २१.४.२०२३
तालुक्यातील समता इंटरनॅशनल स्कुल, कोकमठाण येथे उभ्या असलेल्या मालवाहतुक करणाऱ्या वाहनांची विक्री दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत ई लिलावाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
लिलावाद्वारे विक्री करावयाच्या वाहनांची यादी लिलावाचा दिनांक ठिकाण तसेच अटी विभागाच्या wwww.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून लिलावाबाबची माहिती व वेळापत्रक ई-लिलाव पोर्टल e.auction.gov.in वर उपलब्ध असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
◾
हे हि वाचा : माधुरी दीक्षित : Beauty with Brain कालातीत सौंदर्याची सम्राज्ञी. 'कलावार्ता'मधील गुरुदत्त वाकदेकरांचा लेख
Post a Comment