‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची ‘बोल हरी बोल’मध्ये भन्नाट केमिस्ट्री; 'अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘बोल हरी बोल’चा २८ एप्रिलला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर !



▫️मख़दुम समाचार▫️ 
मुंबई (रा.कों.) २३.४.२०२३
     हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ एक नवा कोरा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. मराठी बिगबॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर, चतुरस्त्र अभिनेते रमेश वाणी आणि ‘नागपूर सुंदरी’ हा किताब मिळविणारी अभिनेत्री आकांक्षा साखरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट दि. २८ एप्रिलपासून एक्स्क्लुझिवली ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पहायला मिळणार आहे. निर्माता सुशीलकुमार अग्रवाल यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.

प्रेम, क्षमा आणि दुसऱ्या संधीची हृदयस्पर्शी कथा म्हणजे चित्रपट 'बोल हरी बोल'. स्वतःच्या सुखवाहू जीवनाची स्वप्न पाहताना, वडिलांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हरी पोंक्षेच्या जीवनावर चित्रपटाची कथा आधारीत आहे. हरीचे वडील, मनोहर पोंक्षे हे सरकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असून, ते एका चाळीत राहतात. मुंबईत स्वत:चा फ्लॅट घेण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि हरीने त्याचे हे स्वप्न पूर्ण करावे अशी त्याची इच्छा आहे. परंतु बाप-लेकाची हि जोडी शेरास-सव्वाशेर आहे. त्यामुळे हि स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच एकमेकांच्या स्वभावासोबत जुळवून घेण्यासाठीची धडपड आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

"कलाकारांची उत्तम फळी लाभलेला 'बोल हरी बोल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाचे अनोखे कथानक आणि उत्तम संदेश सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र ट्रेंड होत असून चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता वाढली असून, दि. २८ एप्रिल रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." अशी प्रतिक्रिया 'अल्ट्रा झकास'च्या वतीने व्यक्त केली जात आहे.

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनिक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी प्लॅटफोर्म अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला 'अल्ट्रा झकास'वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेण्यासाठी १४९ रुपयांत तीन महिने आणि २९९ रुपयाच्या सवलतीत वर्षभर अमर्यादित मनोरंजचा उपभोग घेता येणार आहे.
    अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. तर, लगेच डाउनलोड करा 'अल्ट्रा झकास ओटीटी' ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.
‘बोल हरी बोल’ चा ट्रेलर पहाण्यासाठी :





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा