▫️मख़दुम समाचार▫️
कोल्हापूर (प्रतिनिधी) २३.३.२०२३
या वर्षीचे कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर निवासी प्रबोधन शिबीर ३ दिवसीय असून ते दि. २६, २७, २८ मे २०२३ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील संजीवन इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे.
मी आणि माझा भारत : काल, आज व उद्या
कॉम्रेड गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी, विवेकवादी वैचारिक प्रबोधन चळवळीचे एक स्फूर्तीदायी विद्यापीठ होते. २०१५ मध्ये त्यांच्यावर सनातनी, प्रतिगामी विचारांच्या लोकांकडून झालेला हल्ला आणि त्यांचा दु:खद अंत यानंतर प्रबोधन क्षेत्रात त्यांची पोकळी ठळकपणे जाणवू लागली. देशातील अस्वस्थ करणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक भवतालात महाराष्ट्रातील विवेकवादाचा समृद्ध वैचारिक वारसा नवीन पिढीपर्यंत नेण्याची गरज सर्वच संवेदनशील लोकांना सतत जाणवत असते. याच जाणीवेतून ज्येष्ठ नेते भाई डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कॉ. गोविंद पानसरे युवा जागर समितीची स्थापना झाली.
२०१६ पासून कॉम्रेड पानसरे यांच्या स्मृतीनिमित्त श्रमिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी या संस्था एक अभिनव, निवासी विद्यार्थी - युवक प्रबोधन शिबीर आयोजित करत आहेत. महाराष्ट्रातील तरुणांना विवेकवादाच्या दिशेने घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे.
‘युवक आणि सद्य सामाजिक प्रश्न’, ‘राष्ट्र, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रद्रोह’, ‘मी आणि माझा भवताल’, ‘आपला भारत - बहुविध भारत’ अशा विषयांवरील शिबीरांच्या यशस्वी आयोजनानंतर, आता यावर्षी ‘मी आणि माझा भारत : काल, आज व उद्या’ या मध्यवर्ती विषयावरील ३ दिवसीय निवासी प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इतिहास, विकास व पर्यावरण, शिक्षण व रोजगार, अर्थकारण, संविधान व लोकशाही, जात, धर्म आणि संस्कृती या विषयांवर चर्चा होईल. शिबिरात व्याख्यान, प्रश्नोत्तरे, गटचर्चा, तसेच व्हिडीओ व चित्रपट साधने, संगीत, प्रेरणादायी व्यक्तींची प्रत्यक्ष मुलाखत अशा माध्यमांतून प्रबोधनाचा प्रयत्न होईल.
जात-जमातवाद, राष्ट्रवाद, विकासवाद, उपभोगवाद, धर्मवाद, हिंसावाद, एकसंस्कृतीवाद, बहुसंख्यवाद आणि मानवतावाद, विवेकवाद, पर्यावरणवाद, लोकशाहीवाद, धर्मनिरपेक्षतावाद, अहिंसावाद, सहअस्तित्त्व व बहुसंस्कृतीवाद या संकल्पनांचे आकलन, संभ्रम निराकरण, आणि समतावादी वैचारिकतेची निवड ही भारताच्या भवितव्यासाठी महत्त्वाची ठरते. याच जाणीवेतून विद्यार्थी-युवकांसाठी यावर्षीचे प्रबोधन शिबीर आयोजित करीत आहोत.
कोल्हापुर शहराजवळील पन्हाळा या ऐतिहासिक गडाच्या सान्निध्यात हे शिबीर होत आहे. शिबिरात संवेदनशील, वैचारिक प्रबोधनाची आस असलेले विद्यार्थी, युवक, शिक्षक व बुद्धीजीवी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग अपेक्षित आहे. प्रवेश शुल्क : ३०० रू. असून यामधे नाश्ता, जेवण व निवासाची सुविधा असणार आहे.
गुगल पे, फोन पे 8550931003
नावनोंदणीसाठी सोबतच्या बँक खात्यावर प्रवेश शुल्क जमा करावे आणि आपले नाव व शुल्क भरल्याचे तपशील पाठवावेत.
सुशील सूर्यकांत लाड
बँक ऑफ इंडिया
A/c. No. 090110110001897
IFSC Code - BKID0000901
तसेच अधिक माहितीसाठी सुशील लाड 8550931003, गौरव कांबळे : 7057357025 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश फी भरल्यानंतर कृपया सोबतचा ऑनलाईन अर्ज भरून पाठविणे अनिवार्य आहे. https://forms.gle/upSjV54AMeyY4tKC7
शिबिराचा आयोजक श्रमिक प्रतिष्ठान व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी हे आहेत.
Post a Comment