आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाजोपयोगी व्हावा - डॉ.शिंदे; डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सव संपन्न


◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (विजय मते)  ५.५.२०२३
     आज तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक वस्तू तंत्रज्ञानातच मोडते. विज्ञानाशी तंत्रज्ञानाशी  आपला संबंध खूप जवळचा झाला आहे. मुळात जगाचा आधारच तंत्रज्ञान आहे. विद्यार्थी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कष्ट घेतात. त्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा उपयोग समाजासाठी कसा होईल हे ध्येय असावे. उद्योग क्षेत्रातील मागणी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आवश्यक ते कौशल्य विकसित केल्यास त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.आर.एस.शिंदे यांनी केले.
      विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजयी स्पर्धकांना डॉ.शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह, पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ.विखे  पाटील फौंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड.वसंतराव कापरे, मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ.अभिजित दिवटे, जनरल सेक्रेटरी डॉ.पी.एम. गायकवाड, डेप्युटी डायरेक्टर सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक आदि उपस्थित होते.
      अध्यक्षीय भाषणात डॉ.शिंदे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य विकासाबरोबरच व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. तंत्रज्ञानाने सर्वांना आपलेसे केले त्याची संकल्पना, निर्मिती, उपाययोजना सर्वांसाठी पुरक असतात. जागतिक तापमान कमी करायचे असेल तर पारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवा, असे त्यांनी सांगितले.
      यावेळी अ‍ॅड.वसंतराव कापरे, सुनिल कल्हापुरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणातून कानमंत्र दिला.
      युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे डेज् साजरे केले. त्यामध्ये त्यांच्या कला-गुणांचा अविष्कार सादर केला. हा महोत्सव आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता. या चार दिवसीय युवा महोत्सवात ग्रुप डे, ट्रॅडिशनल डे, मिसमॅच डे, साँग डे, आणि बॉलीवूड डे याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रॅम्प वॉक व विविध पारंपारिक वेशभुषा सर्वांचे आकर्षण ठरले. 
       कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनासाठी युवा महोत्सव रिदम २०२३ कोऑडीनेटर प्रा.सुनिल मांढरे, इले.विभाग  प्रा.निळकंठ देशपांडे, ई अ‍ॅण्ड टी.सी. विभाग तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास  डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, तसेच विभागप्रमुख यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे . यांनी कौतुक केले.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा