मातृत्वदिनी जननीचे पोस्टर रिलीज; लवकरच ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर होणार 'एक्स्क्लुझिव ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’


▫️मख़दुम समाचार▫️ 
मुंबई (रा.कों.) १५.५.२०२३
     अल्पावधीत प्रेक्षक पसंती मिळविणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने मातृदिनाचे औचित्य त्यांच्या ‘जननी’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि आयेशा झुल्का यांच्या भावमुद्रा असलेले 'जननी'चे हृदयस्पर्शी पोस्टर सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधत असून मातृत्व प्रेमाचे भावबंध अधोरेखित करणारी विलक्षण कथा घेऊन जननी लवकरच  ‘अल्ट्रा झकास’ (Ultra Jhakaas) या मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, आयेशा झुल्का यांसह अभिनेते मोहनीश बहल, अमन वर्मा, विनीत रैना आणि सोनिका हंडा या कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाच दिग्दर्शन चंदर एच. बहल यांनी केलं आहे. तर अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आईच्या आपल्या मुलांवरील प्रेमाचा आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या आईच्या मातृत्वाची कथा ‘जननी’ चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आली असून मूळ हिंदी असलेला हा चित्रपट संपूर्णपणे मराठी भाषेत खास 'अल्ट्रा झकास' या मराठमोळ्या ओटीटीवर पाहता येणार आहे. 

"कलाकारांची उत्तम फळी लाभलेला आमचा हा चित्रपट मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. तत्कालीन परिस्थितीत सरोगसी सारख्या विषयावर प्रकाश टाकणारा विषय आम्ही ‘जननी’ चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला होता. आता अल्ट्रा झकास (Ultra Jhakaas) मराठी ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाता येणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. 

App link:

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा