▫️मख़दुम समाचार▫️
नेवासा (कार्तिक पासलकर) १७.५.२०२३
तालुक्यातील चांदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामविकास अधिकारी आरगडे भाऊसाहेब यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी सरपंच सुनंदा सदाशिव दहातोंडे होत्या. संभाजी दहातोंडे यांनी सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. ग्रामसभेत किरण जावळे, महेश दहातोंडे, शरद टेकाडे, सुभाष शेंडे, रशीद इनामदार, कार्तिक पासलकर यांनी ठराव मांडून आपले मनोगत व्यक्त केले.
ग्रामसभेसमोर जलजीवन अंतर्गत १३ कोटींचे विकासकामे सुरू असून यामध्ये चार पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण तसेच वाड्यावस्त्यांवर पाईपलाईनद्वारे स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी पोहचवणे हा उद्देश आहे. रशीद इनामदार यांनी गावातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचा प्रश्न मांडून मार्गी लावण्याचा ठराव मांडला. किरण जावळे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. रस्त्याने जाता येता अपघात होऊन मागील काही दिवसांत बरेच विद्यार्थी जखमी झाले. वेळोवेळी ठराव मांडूनही अंमलबजावणी केली जात नाही तर यावेळी चर्च ते चांदेकर वस्तीपर्यंत हायवेवर रस्ता दुभाजक (डिव्हायडर) बसवण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव त्यांनी मांडला.
ग्रामविकास अधिकारी यांना उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF) कडून त्यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्तिक पासलकर यांनी काही ठराव मांडले. त्यात पहिला ठराव गावातील अधिकृत वाचनालय जे बंद आहे ते सुरू करावे. ग्राम सुशोभिकरण करावे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी काही ठिकाणी सिमेंट बाकडे बसवावे. अतिरिक्त आधार केंद्र सुरू करावे. करार मुदत रद्द होऊन कराराचे नूतनीकरण न करणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई करून गरजू व्यवसाय करणाऱ्या युवकांना गाळे देण्यात यावेत. ज्यांना घरचे नाहीत अशा गरजू नागरिकांचा ग्रामपंचायत मार्फत सर्व्हे करून पाठपुरावा करून त्याना घरकुल योजना प्राप्त करून द्यावी. ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य सूचना करूनही हजर राहत नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच बाजारतळाच्या मैदानाला 'छत्रपती शिवाजी महाराज मैदान' हे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी उपस्थित उपसरपंच वर्षा सागर जावळे, अरुण बाजारे, चांगदेव दहातोंडे, प्रवीण दहातोंडे, गोरक्षनाथ दिवटे, राजू शेटे, रशीद सय्यद, अंजबापु म्हेत्रे, दादू पंडित, अमित रासने, सागर जावळे, मिनीनाथ थिटे, संतोष जावळे तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते. आभार कल्पना लोखंडे यांनी आभार मानले.
Post a Comment