◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (प्रतिनिधी) ४.५.२०२३
देशात लोकशाहीप्रति आदर असणा-या नागरिकांसाठी हा खडतर काळ आहे. संविधानिक मूल्ये पायदळी तुडवली जाण्याचा अनुभव सातत्याने येत आहे. या वातावरणात सरकारला, सत्तेला जाब विचारणारे, निर्भिड नागरिक सक्रिय होण्याची गरज आहे. देशभर सुरू असलेल्या धर्मांध लोकशाहीविरोधी दडपशाहीविरूध्द लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत 'निर्भय बनो' हि मोहिम सुरू केलेली आहे.
त्याचाच भाग म्हणून अहमदनगर येथे विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे, हेरंब कुलकर्णी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दि. ५ मे २०२३ रोजी सकाळी १० ते ११.३० यावेळेत नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीस शहरातील पुरोगामी पक्ष संघटनांसह लोकशाहीवादी नागरिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे ब्रिटीशविरोधी लढ्याचे शिलेदार होते. त्यांनी जनतेसाठी क्रांतिकारी कार्य केलेले आहे. त्यांची समाधी शहरातील रेसिडेन्शिअल हायस्कूलसमोर आहे. छत्रपतींच्या समाधीस अभिवादन करून बैठकीस सुरूवात होणार आहे. लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. ठिकाण छत्रपती चौथे शिवाजी महाराज हुतात्मा स्मारक, रेसिडेन्शिअल हायस्कूलसमोर, अहमदनगर. त्यात मुख्यतः या चळवळीचा उद्देश आणि शक्य झाल्यास कृती कार्यक्रमांवर चर्चा होणार आहे.
या बैठकीस आपण उपस्थित राहावे तसेच जास्तीत जास्त सजग व संविधान प्रेमी नागरिकांपर्यंत या बैठकीबाबत माहिती पोहोचून त्यांनाही सामील होण्याचे टीम निर्भय बनो'च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment