मे महिन्याच्या सुट्टीत सोडवा चित्तथरारक रहस्य; स्टोरीटेल'वर ‘शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा’ अभिनेता कवी गायक संदीप खरे यांच्या आवाजात!

▫️ मख़दुम समाचार▫️ 
मुंबई (रा. कों) २.५.२०२३
   शेरलॉक होम्स होता तरी कोण? एक काल्पनिक पण प्रभावी व्यक्तिमत्व ! निरिक्षण आणि निष्कर्ष शास्त्राचा प्रणेता ! गुप्तचरांचा परात्पर गुरू. त्याने अनेक रहस्ये आपल्या बुध्दिचातुर्याने उलगडली. स्कॉटलंड यार्ड या गुप्त पोलिसांच्या बालेकिल्ल्याचा तो फार मोठा आधार होता. तो केवळ बौध्दिक यंत्र नव्हता तर तो संवेदनशील माणूस होता. त्याच्या मध्ये माणूसकीचे निर्झर होते. म्हणून तो ख-या व्यक्तिमत्वा इतकाच लोकप्रिय झाला आहे आणि होतच राहिल...!

सर ऑर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा जगभर लोकप्रिय झाल्या. जगभरातील सर्व भाषांत त्यांची भाषांतरे झाली. एवढेच नव्हे तर शेरलॉक होम्सच्या रहस्यकथांवर आधारित अनेक टि.व्ही.मालिका आणि चित्रपट निघाले. इतकेच नव्हे तर शेरलॉक होम्सचे आधुनिक काळातील रूप कसे असेल अशी कल्पना करूनही अनेक कथा, मालिका व चित्रपट तयार झाले. शेरलॉक होम्स हे नाव त्यामुळेच जागतिक साहित्यात अजरामर झाले. 

स्टोरीटेल ने शेरलॉक होम्सला सर्व भाषांमधून ऑडिओबुक स्वरूपात सादर करायचे ठरवले आणि इंग्रजीसह अनेक युरोपयिन भाषांत होम्सच्या कथा सादर केल्या आहेत. मराठीमध्ये सुप्रसिध्द लेखक आणि नाट्यकर्मी भालबा केळकर यांनी केलेले शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे अनुवाद लोकप्रिय आहेत. स्टोरीटेलसाठी त्यातील वीस रहस्य कथांचे सादरीकरण संदीप खरे यांनी अभिवाचन करून केले आहे. 
मे महिन्याच्या सुट्टीत कुमार वयोगटातील मुलांना या रहस्यकथा ऐकताना जुना ब्रिटीश काळ आणि तेव्हाची संस्कृती समजेल तर रहस्यकथा प्रेमी वाचकांना या कथा नव्याने ऐकताना पु्र्नप्रत्ययाचा आनंद मिळेल.

एक मे पासून दर दिवसाआड एक कथा याप्रमाणे या वीस कथा स्टोरीटेलवर प्रकाशित होणार आहेत.
शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे संदीप खरे यांनी केलेले अभिवाचन ऐकण्यासाठी लिंक





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज


Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा