▫️ मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (प्रतिनिधी) ३.५.२०२३
शेतकऱ्यांवर एका वर्षात अनेक वेळा आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. याकडे शासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे. लहान बाळाप्रमाणे सांभाळलेल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा कुटुंब नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असून सरकारने शेतकऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असून. सरकारने वेळीच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करायला हवे होते परंतु सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.
सरकारचा निषेध म्हणून शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी यांचा जिल्हाधिकारी कार्यालय समोर तोंड झोडून अन्नत्याग आंदोलन करताना शेतकरी बाळासाहेब शिंदे, सदाशिव शिंदे, नारायण गवांडे, रामराव बेडके, एम.के.लाकडे, विजय रणदिवे, भाऊसाहेब उंदरे, सर्जेराव बेडके, विलास माळी, भाऊराव गोलवड, एकनाथ इथापे, जगन्नाथ शिंदे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये नासाडी होऊन व कवडीमोल मिळालेल्या बाजार भावाने शेतकऱ्यांच्या कुटुंबाची स्वप्न धुळीस मिळाली. याचाच गांभीर्य सरकारने घेतला नाही. शेतकरी अन्नदाता आज कर्जबाजारी होऊन आर्थिक, मानसिक व नैसर्गिक संकटात सापडून मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या प्रश्नाचा पाठपुरावा तसेच उपोषणे आंदोलने करून आपले प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्य न घेता दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचे आर्थिक संकटाची व शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे दुर्लक्ष केलेले दिसत आहे. शेतकरी कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असे शेतकरी हिताची ठोस निर्णय जसे महागाईच्या काळाचा विचार करून शेतीमालाला दुप्पट हमीभाव. शेतीमालावरील कायमस्वरूपी विनाअट खुले निर्यात धोरण व साखरेचे खुले निर्यात धोरण व नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत असे ठोस निर्णय यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन आत्मनिर्भर होईल असे शेतकरी हिताचे निर्णय जाणून-बुजून सरकार घेत नाही. महागाईच्या काळात सरकारने दिलेली शेतीमालाचे तुटपुंजी हमीभावामुळे शेतकऱ्यांचा विकास होऊ शकत नाही. शेतीमालावरील निर्यात धोरणाची धर सोड पणामुळे शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जाऊन शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना विलंब करून दिली जाणारी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या मानसिकतेला कारणीभूत ठरत आहे.
या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचा आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सरकारच्या शेतीमाल आयात निर्यात धोरणांमध्ये शेतकऱ्यांची हित लक्षात न घेता घेतलेले निर्णय हे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला व कर्जबाजारीला जबाबदार असून याचा निषेध करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंड झोडून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
◾
🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज
Post a Comment