रेल्वे सल्लागार समितीवर विशाल गणेश देवस्थानचे अशोक कानडे यांची फेरनिवड !


▫️ मख़दुम समाचार  ▫️

अहमदनगर (प्रतिनिधी)  ९.५.२०२३

      येथील रेल्वे स्थानकाच्या सल्लागारपदी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे सचिव व शहर सहकारी बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अशोक कानडे यांची फेर निवड करण्यात आली. सोलापूर विभागीय सहाय्यक वाणिज्य प्रबंधक कल्पना बनसोडे यांनी नुकतेच नियुक्तीपत्र दिले.

     कानडे हे गेली १० वर्षापासून सल्लागार म्हणून काम करत आहेत. अहमदनगर-पुणे शटल रेल्वे सुरु करण्याबाबत गेली दोन वर्षांपासून सेंट्रल रेल्वे प्रशासन, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खा.दिलीप गांधी यांच्या सहकार्याने प्रयत्न केले.

     लवकरच अहमदनगर-पुणे फास्ट शटल रेल्वे सुरु होईल. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्यांना अहमदनगर रेल्वे स्थानक येथे थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अहमदनगरचे मुख्य वाणिज्य निरिक्षक आर.एस.मीना, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हरजीतसिंह वधवा, संदेश रपारिया, दुर्गे, तोमर यांचे नेहमी सहकार्य लाभते, असे निवडीनंतर कानडे यांनी सांगितले.

     अशोक कानडे यांची रेल्वे सल्लागार समितीवर अशोकराव कानडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.






🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा