चांगल्या कामामुळे सभासद सहकार पॅनलच्या मागे उभे राहतील - नरेंद्र फिरोदिया; सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्था निवडणूक सहकार पॅनलचा शुभारंभ !

 


◽ मख़दुम समाचार ◽

 अहमदनगर (मुकूंद भट) २२.६.२०२३

    सहकार महर्षी श्री सुवालाजी गुंदेचा यांनी समाजातील प्रत्येक घटकांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी या पतसंस्थेची स्थापना केली. अल्पावधीतच पतसंस्थेने नेत्रदिपक प्रगती करत समाजोन्नत्तीचे काम केले आहे. कोणतीही संस्था ही संचालकांच्या चांगल्या धोरणातून पुढे जात असते. त्यासाठी चांगले संचालक निवडून देऊन सभासदांनी पतसंस्थेची उन्नत्ती साधावी. सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार हे समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने सभासद त्यांच्या मागे निश्चित उभे राहतील, असा विश्वास नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.

     सहकार महर्षी श्री सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत सहकार पॅनलचा शुभारंभ आनंदधाम येथे झाला. याप्रसंगी जैन ओसवाल समाजाचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, जैन कॉन्फरन्सचे वरिष्ठ मार्गदर्शक बाबूशेठ बोरा, सचिव शैलेश मुनोत, उपाध्यक्ष अशोक पितळे, पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक शांतीलाल गुगळे, सुवेंद्र गांधी आदि मान्यवर उपस्थित होते.

     याप्रसंगी बाबुशेठ बोरा, अशोक पितळे व शैलेश मुनोत म्हणाले, की समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, त्यांची समाजात पत निर्माण व्हावी, यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम या संचालक मंडळाने केले आहे. अशा पतसंस्थेत चांगले संचालक निवडून देऊन पतसंस्थेची प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     यावेळी जेष्ठ संस्थापक संचालक म्हणाले की नव्या जुन्या तरुण उमेदवारांचा संगम म्हणजे पतसंस्थेसाठी दुग्दशर्करा योगच म्हणता येईल.

     प्रचाराचा शुभारंभ म.सा. राष्ट्रसंत आचार्य प.पू. आनंदऋषीजी म.सा. यांच्या ध्वनीमृद्रीत मंगल पाठाने तसेच प.पु. कुंदनऋषीजी म.सा., प.पू. आदर्शऋषीजी यांच्या मंगल पाठाने झाला. याप्रसंगी उमेदवार विद्यमान संचालक संतोष गांधी, समीर बोरा, अभय पितळे, शैलेश गांधी, सुवर्णा प्रमोद डागा, पंडित खरपुडे, विनय भांड तसेच नवीन उमेदवार चेतन भंडारी, आनंद फिरोदिया, विनित बोरा, नितीन पटवा, प्रिती प्रतीक बोगावत, शरद गोयल, आदि उपस्थित होते.

     यावेळी बोलताना पतसंस्थेचे माजी चेयरमन ईश्वर बोरा म्हणाले की गत ६ वर्षाच्या कार्यकाळात संस्थेच्या ठेवी या २६ कोटींवरून ८० कोटींपर्यंत नेत संस्थेची स्वमालकीची भव्य अशी नूतन इमारत बांधण्यात आली आहे. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे कामी संस्थेने अनेक शाश्वत कर्ज जसे की सोने तारण, माल तारण यावर भार दिला आहे. संस्थेच्या ठेवी अनेक वेगवेगळ्या बँकेत ठेवून संस्थेची आर्थिक बाजू सक्षम करत पतसंस्थेच्या एनपीए मध्ये देखील लक्षणीय घट नोंदवून एनपीए ५.८० पर्यंत खाली आणत अनेक थकीत कर्जदारांविरुद्ध कारवाई करुन या संचालक मंडळाने सभासदांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.  भविष्यात देखील सहकार पॅनलच्या माध्यमातून आत्ता पुन्हा विद्यमान ७ व नवीन ६ उमेदवार घेऊन नवीन जुन्याचे संगम करत सर्वसमावेशक असे पॅनेल दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी पोपट भंडारी, पतसंस्थेचे जेष्ठ संचालक माजी चेअरमन शांतिलाल गुगळे, अजित बोरा, किरण शिंगी, मोहन मानधना, मर्चेंट बँकेचे अनिल पोखरणा, किशोर गांधी, संजय चोपडा, संजय बोरा, कमलेश भंडारी, वाईस चेअरमन अमित मुथा, नगर अर्बन बँकेचे संपत बोरा, ईश्वर बोरा, अजय बोरा, शहर सहकारी बँकेचे डॉ. विजय भंडारी, आडते बाजार एसोसिएशनचे संतोष बोरा, अशोक राजू डागा, प्रकाश रामलाल गांधी, अजय फिरोदिया, योगेश चांगेडिया, जितो अहमदनगरचे गौतम मुनोत, यूथ विंगचे गौतम मुथा, पोपट भंडारी, प्रदीप भंडारी, ओसवाल सभाचे अतुल शिंगवी, राजेश भंडारी, श्रावक संघाचे उमेश बोरा, अभय लुणीया, आनंद चोपडा, संतोष गांधी, नितीन शिंगवी, प्रविण मुनोत, इंडस्ट्रियल एस्टेटचे अध्यक्ष अरविंद गुंदेचा, मेहुल भंडारी, नरेश गांधी, सुभाष पटवा, हिंद सेवा मंडळचे डॉ. पारस कोठारी, जैन ओसवाल युवक संघाचे माजी अध्यक्ष सचिन डुंगरवाल, भूषण भंडारी, राजेश बोरा, महेश भळगट, प्रीतम पोखरणा, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी, हर्षल बोरा, स्वप्नील मुनोत, राकेश भंडारी, रोहन बोरा, प्रसाद बोरा, वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदित्य गांधी, उपाध्यक्ष संभव काठेड, धनेश गांधी, आनंद भंडारी, नितीन गांधी, राजकुमार लुणे, जय आनंद फाउंडेशन चे वैभव मेहेर, अभिजित मुनोत, गौरव बोरा, ॲड. विजय लुणे, ॲड. विजय मुथा, ॲड. दीपक चांगेडिया, ॲड. प्रदीप भंडारी, सचिन मुनोत, मनीष बोरा, अमोल कटारिया, प्रशांत डागा, राजेश चांगेडिया, वैभव गुगळे, विशाल भंडारी, महेश बोरा, योगेश चंगेडिया, अमृत पितळे, संतोष कासवा, योगेश मुनोत, विशाल गुंदेचा, राजू खिवंसरा, सुरेश गुंदेचा, महावीर गुगळे, प्रशांत मुनोत असे समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा