मख़दूम समाचार
पाथर्डी (प्रतिनिधी) २९.६.२०२३
श्रीमती शकुंतला चांगदेव काळोखे यांचे शनिवारी ता.२४ जून २०२३ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार, ता.३ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता गाडगे आमराई, मोहरी रोड, ता. पाथर्डी, जि.अहमदनगर येथे सत्यशोधक पद्धतीने होणार आहे. त्यानंतर निवासी मतिमंद विद्यालय, मोहरीरोड, हंडाळवाडी शिवार, पाथर्डी येथे सर्वधर्मीय सद्भावना सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी पारनेर येथील डॉ.आर.जी. सय्यद यांचे प्रवचन होईल. याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे शशिकांत चांगदेव काळोखे,
श्रीकांत चांगदेव काळोखे व जयश्री अविनाश दिवेकर यांनी कळविले आहे.
Post a Comment